आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेलाणी प्रकरणातील अाराेप दखलपात्रच, जिल्हा वकील कार्यालयाचा पाेलिसांना अभिप्राय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गाेलाणी मार्केट महापालिकेच्या १७ मजली इमारतीच्या बांधकाम गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे कायदेशीर अडसर दूर झाले अाहेत. पालिका अायुक्तांनी दिलेल्या फिर्यादीत तथ्य असून, त्यातील अाराेप गंभीर स्वरूपाचे दखलपात्र अाहेत, असा अभिप्राय जिल्हा सरकारी वकील कार्यालयाने पाेलिस प्रशासनाला दिला अाहे. मात्र, पाेलिसांनी यासंदर्भात कानावर हात ठेवले अाहेत.

नगरपालिका असताना सन १९८८ ते २००१ यादरम्यान व.वा.व्यापारी संकुल अर्थात गाेलाणी मार्केट महापालिकेची १७ मजली इमारत बांधण्याची प्रक्रिया राबवण्यात अाली हाेती. यात दिरंगाई, नियमांची पायमल्ली, बेकायदा कार्यालयीन कामकाज, नगरपालिका निधीचा सर्रास वापर करण्यात अाला. तसेच न्यायालय, नगरपालिका सभागृह शासनाची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवण्यात अाला अाहे. या प्रकरणी तत्कालीन नगराध्यक्ष सुरेश जैन यांच्यासह सुमारे १५० जणांवर २१० काेटी ७२ लाख ३१ हजार ७५० रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे फिर्यादीत म्हटले अाहे. ही २२ पानांची फिर्याद अायुक्त संजय कापडणीस यांनी जुलै२०१५ राेजी शहर पाेलिस ठाण्यात दिली हाेती. त्यानंतर पाेलिसांनी तक्रारीत सात प्रकारच्या त्रुटी काढल्या हाेत्या. परंतु त्यात महापालिकेच्यावतीने सर्व काही फिर्यादीत लेखापरीक्षणात नमूद असल्याचे कळवण्यात अाले हाेते.

अभिप्राय देऊन महिना उलटला
हिवाळी अधिवेशाना दरम्यान पाेलिसांनी अभिप्रायाचे पत्र दिल्यानंतर काही दिवसांतच सात पानांचा अभिप्राय पाेलिस प्रशासनाला कळवला अाहे. यात अायुक्तांच्या फिर्यादीचा गाभा हा दखलपात्र स्वरूपाचा अाहे. यात केलेले अाराेप गंभीर स्वरूपाचे असून गुन्हा दाखल करता येईल, असा अभिप्राय दिला अाहे. या संदर्भात काेणत्याहीक्षणी पाेलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हाेऊ शकते.

मागवला अभिप्राय : अायुक्तांनी दिलेल्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल करताना पाेलिसांना काही अडचणी हाेत्या. त्याबाबत शहर पाेलिसांनी पालिकेशी पत्रव्यवहार देखील केला हाेता. अपर पाेलिस अधीक्षक कार्यालयाकडून जिल्हा सरकारी वकील कार्यालयाला पत्र देऊन तक्रारीबाबत गुन्हा दाखल करता येईल का? या संदर्भात अभिप्राय मागितला हाेता. दरम्यान, अपर पाेलिस अधीक्षक ठाकूर यांनी जिल्हा सरकारी कार्यालयाच्या अहवालासंदर्भात बाेलणे टाळले.

तांबे-कापडणीस भेट
शुक्रवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास शहर पाेलिस ठाण्याचे निरीक्षक नवलनाथ तांबे यांनी अायुक्त कापडणीस यांची भेट घेतली. या वेळी दाेघांची बराच वेळ चर्चा झाली. विशेष म्हणजे, या वेळी पालिकेचे वरिष्ठ अधिकारीदेखील अायुक्तांच्या दालनाबाहेर थांबून हाेते. तांबे यांनी या भेटीमागे खासगी काम असल्याचे सांगितले.