आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांवर दराेड्याचा गुन्हा, जिल्हा बँकेत संचालकांच्या खुर्ची फेकणे भोवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाहेर कामबंद आंदोलन करताना बँकेचे कर्मचारी.
जळगाव - हवामानावर आधारित पीक विम्याच्या लाभापासून वंचित शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मंगळवारी व्यवस्थापकांची (एमडी) खुर्ची फेकली हाेती. या प्रकरणी शेतकऱ्यांवर शासकीय कामात अडथळा अाणणे दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. बुधवारी जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद अांदाेलनाचे हत्यार उपसत पाेलिस यंत्रणेवर दबाव अाणला. त्यामुळे पाेलिसांनी शेतकऱ्यांवर दराेड्याचा गुन्हा दाखल केला अाहे.

पिंप्राळा सर्कलमधील जिल्हा बँकेच्या ८७९ सदस्य शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम भरलेली आहे. मात्र, त्यापैकी केवळ २१७ शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाल्याचा आरोप करत मंगळवारी शेतकरी बँकेत अाले हाेते. त्या वेळी त्यांना अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यांनी जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख यांच्या दालनात त्यांच्या खूर्चीसह इतर खुर्च्यांची फेकाफेक केली. त्यानंतर सायंकाळी वाजता जिल्हा बँकेचे मुख्य व्यवस्थापक प्रकाश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. या घटनेचा निषेध म्हणून बुधवारी बँकेच्या जिल्हाभरातील हजार २६ कर्मचाऱ्यांनी बुधवारी काळ्याफिती लावून काम बंद अांदाेलन केले. त्यानंतर सेंट्रल काे-अाॅप बॅंक्स स्टाॅफ युनियनतर्फे जिल्हा पाेलिस ठाण्याच्या निरीक्षकांना निवेदन देण्यात अाले. अशा घटना बंॅकेच्या प्रशासकीय कार्यालयात किंवा बंॅकेच्या शाखांमध्ये हाेऊ नये. बॅक कर्मचाऱ्यांना सुरक्षितता मिळावी, तसेच मंगळवारी गाेंधळ घालणाऱ्या शेतकऱ्यांना अटक करावी अन्यथा अांदाेलन तीव्र करण्याचा इशारा निवेदनात करण्यात अाला अाहे. दरम्यान कर्मचाऱ्यांच्या काम बंदमुळे शहरातील १६ तर जिल्ह्यातील २५२ बँकेच्या शाखा बंद हाेत्या. त्यामुळे शहरातील ५० काेटी तर जिल्ह्यात १०० काेटींचे व्यवहार ठप्प झाले.

राजकीयदबावाखाली कारवाई
जिल्हाबँकेत पीक विम्यासंदर्भात जाब विचारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर मोठ्या राजकीय दबावामुळे पोलिसांनी अन्यायकारक कलमे लावून गुन्हा दाखल केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी पत्रकाद्वारे केला आहे. बँकेत कुठलीही मोडतोड झाली नाही. तसेच कागदपत्रांना हात लावलेला नाही. जिल्हा बँक ही शेतकऱ्यांच्या हिताची आहे. तर विमा कंपनी शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहे. ३१ जुलै रोजी मुदत संपलेल्या विम्याच्या रकमेविषयी जाब विचारणे गुन्हा आहे काय? जिल्हापेठ पोलिस ठाण्यात खोटी माहिती देऊन पोलिस यंत्रणेचा राजकीय गैरवापर करीत शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या शेतकरी प्रतिनिधींच्या पाठीशी एकजुटीने उभे राहण्याचेही आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे. निवेदनावर संजय घुगे, मुरलीधर पाटील, विनायक चौधरी, सुकलाल पवार, अनिल सपकाळे, हर्षल पाटील, भरत जाधव आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

पीक विम्याची फाइल पळवली म्हणून गुन्हा
पिंप्राळा सर्कलमधील शेतकऱ्यांवर शासकीय कामात अडथळा अाणि दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. बुधवारी जिल्हा बँक प्रशासनाने पाेलिसांवर दबाव अाणून शेतकऱ्यांवर दराेड्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली हाेती. त्यामुळे अखेर संध्याकाळी जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात सुमारे १५ ते २० शेतकऱ्यांवर पीक विम्याची फाइल जबरदस्तीने पळवली म्हणून दराेड्यांचा गुन्हा दाखल झाला अाहे. यात पाेलिसांनी कलम ३९५ (दराेडा), ३५३ (शासकीय कामात अडथळा), १४३ (दंगल), ४२७ (शासकीय मालमत्तेचे नुकसान), ५०६ (धमकी देणे) दाखल केले अाहेत.

शेतकरी नाराज
जिल्ह्यातीलहजार २९५ गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती अाहे. त्यामुळे शेतकरी पीक विम्याचे पैसे मागणासाठी बँकेत गेले हाेते. तरीही शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले. याबाबत जिल्ह्यातील शेतकरी नाराज आहेत.

अाम्ही शेतकऱ्यांची मुले
जिल्हा बँकेत काम करणारे सर्वच शेतकऱ्यांची मुले अाहेत. त्यामुळे बंॅक कर्मचारी हे शेतकऱ्यांसाठी काम करतात. सुरेश राणे, कनिष्ठ बँकिंग अधिकारी

हा प्रकार चुकीचा
जिल्हा बँकेत मंगळवारी शेतकऱ्यांनी केलेला प्रकार चुकीचा अाहे. अगाेदरच बँकेत कर्मचारी कमी अाहेत. त्यात असे प्रकार हाेत असतील तर कर्मचाऱ्यांची मानसिकता खराब हाेईल. त्यामुळे गाेंधळ घालणाऱ्यांना अटक करावी अन्यथा अांदाेलन तीव्र करण्यात येईल. किरण साळुंखे, अध्यक्ष,सेंट्रल काे-अाॅप बॅंक्स स्टाॅफ युनियन