आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसमध्ये चढताना महिलेच्या पर्समधून चाेरट्यांनी दागिने लांबवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- औरंगाबाद बसमध्ये चढताना महिलेच्या पर्समधून चाेरट्यांनी दाेन ताेळे साेन्याचे दागिने लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजता जळगाव बसस्थानकावर घडली. याप्रकरणी महिलेने जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 
 
मूळचे कारखेडा (जि.यवतमाळ) येथील गाेपाळ वसंत ठाकरे (वय ३५) हे सुरत येथे हिऱ्याच्या व्यापाऱ्याकडे काम करतात. ते कुटुंबासह शनिवारी जामठा (जि.बुलडाणा) येथील मित्राच्या लग्नाला जात होते. ते सकाळी वाजता पत्नी मयुरी ठाकरे (वय २८), सुरेश ठाकूर, किसन भालेराव यांच्यासह सुरत भुसावळ पॅसेंजरने जळगावात उतरले. त्यानंतर चाैघे १० वाजता बसस्थानकावर आले. या वेळी अाैरंगाबाद बसमध्ये चढताना खूप गर्दी असल्याने ते अर्ध्यातून उतरून बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या बसमध्ये चढले. मात्र, बसमध्ये बसल्यानंतर मयुरी ठाकरे यांना पर्सची चेन उघडी दिसली. त्यांनी पर्स तपासल्यानंतर त्यातील छाेटी पर्स गायब हाेती. त्या पर्समध्ये दाेन ताेळे साेन्याचे दागिने, दाेन हजार रुपये राेख, असा एकूण ५५ हजारांचा एेवज हाेता. ताे चाेरट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात अाले. त्यांनी पती गाेपाळ ठाकरे यांना चोरीबाबत सांगितले. त्यांनी तत्काळ गाडीच्या खाली उतरून चोरट्याचा शाेध घेतला. मात्र, त्यांना काहीच सापडले नाही. त्यानंतर सर्वांनी गाडीतून उतरून जिल्हापेठ पाेलिस ठाणे गाठले. त्या ठिकाणी गोपाळ ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 
बातम्या आणखी आहेत...