आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धडक मोहीम: जळगावात धर्मादाय रुग्णालयांचीही तपासणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या रुग्णांवर उपचार करणार्‍या धर्मादाय संस्थांच्या रुग्णालयांना शासनाकडून विविध सवलती दिल्या जातात. त्यामुळे या रुग्णालयांकडून केल्या जाणार्‍या उपचाराची गुणवत्ता, दर्जा या संदर्भात तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीसाठी जिल्हा पातळीवर समिती गठित करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत, पालिकेतर्फे यावर एक प्रतिनिधी देण्याचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे.

शासनातर्फे गठित करण्यात येत असलेल्या समितीच्या सदस्यांकडून संबंधित रुग्णालयांची अचानक तपासणी करण्यात येणार आहे. रुग्णालयातील रुग्ण तपासणीचे केसपेपर, रुग्णांवर करण्यात आलेल्या चाचण्या आवश्यक होत्या काय, चाचण्या करण्यासाठी आकारलेला खर्च वाजवी आहे किंवा नाही याबाबींची तपासणी करण्यात येईल. रुग्ण आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे किंवा नाही याबाबत सादर करण्यात आलेली कागदपत्रे, रुग्णालयांचा आय.पी.एफ. फंड त्यातून झालेला खर्च याचीही तपासणी पथकाकडून केली जाणार आहे. चार सदस्यीय पथक गठित करण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

अशी असेल समिती
चार सदस्यीय समितीचे अध्यक्षपद सह धर्मादाय आयुक्त असतील. आरोग्य सेवा विभागाचे सहायक संचालक सदस्य सचिव असतील. दोन सदस्यांमध्ये एक पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी किंवा त्यांच्याकडून नियुक्त प्रतिनिधी व सहायक विक्रीकर आयुक्त यांचा समावेश असेल.

शासनाची समिती धडकणार
> शासनाच्या चार सदस्यीय समितीकडून अचानक होणार तपासणी
> केसपेपर रुग्णांवरील चाचण्या, त्यासाठी आकारलेल्या खर्चाची माहिती घेणार.
> रुग्णालयांच्या ‘आयपीएफ’सह कागदपत्रांची पडताळणी करून शासनाला अहवाल देणार.