आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिस ठाण्याचा दूरध्वनी डायल करताच ‘चार्ली’ येणार मदतीला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी पाेलिस उपअधीक्षक राेहिदास पवार यांनी भुसावळात दाेन बीट मार्शलचे ‘चार्ली’ पथक नियुक्त केले अाहे. त्यात अाठ कर्मचाऱ्यांचा समावेश अाहे. घात, अपघात, गुन्ह्याची माहिती पाेलिस ठाण्याच्या दूरध्वनीवर देताच हे पथक मदतीसाठी धावणार अाहे. शहर बाजारपेठ पाेलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक पथक निरंतर २४ तास तैनात असेल.

शहरात गेल्या दीड ते दाेन वर्षांपासून गुन्हेगारीचा अालेख सातत्याने वाढत अाहे. खून, दराेडे, घरफाेड्या, गाेळीबार या घटना तर नित्याच्याच झाल्या की काय? असा प्रश्न निर्माण झाला अाहे. कायदा-सुव्यवस्था धाेक्यात अाल्याने पाेलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले अाहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पाेलिसांनी अाता गुन्हेगारांना अद्दल घडवण्यासाठी कृतिशील पावले उचलली अाहेत. डीवायएसपी राेहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाेन बीट मार्शल नियुक्त करण्यात अाले अाहेत. त्यात शहर बाजारपेठ पाेलिस ठाणे कार्यक्षेत्रात प्रत्येकी दाेन दुचाकीवर वाॅकी-टाॅकीसह चार पाेलिस दक्ष असतील. घात, अपघात, गुन्हा, संशयास्पद हालचालींची माहिती मिळताच बीट मार्शल पथक घटनास्थळी धाव घेईल. पाेलिसांनी या पथकाला चार्ली नंबर चार्ली नंबर असे नाव दिले अाहे. हे पथक दुचाकींवर नियमित गस्तही घालणार अाहे.

अाठवडे बाजार चाैकी सुरू
गेल्या वर्षभरापासून धूळ खात पडलेली अाठवडे बाजार पाेलिस चाैकी साेमवारपासून सुरू करण्यात अाली अाहे. या ठिकाणी २४ तास पाेलिसाची ड्यूटी लावण्यात येणार अाहे. उपअधीक्षक राेहिदास पवार यांच्या हस्ते चाैकीचे उद‌्घाटन झाले. बाजारपेेठचे निरीक्षक किसन नजनपाटील, शहरचे निरीक्षक बाळासाहेब केदारे यांच्यासह कर्मचारी या वेळी उपस्थित हाेते.

राजकीय हस्तक्षेप करू नये
शहरातील गुन्हेगारीचा बिमाेड करण्याचा पाेलिसांचा प्रामाणिक प्रयत्न अाहे. मात्र, गुन्हेगारांवर अतिशय नि:पक्षपातीपणे कारवाई हाेत असताना राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करू नये. हद्दपारीचे १४ प्रस्ताव प्रांत कार्यालयात अाॅगस्टपासून पडून अाहेत. ते मार्गी लागले तर शहरातील अन्य गुन्हेगारांवर वचक निर्माण हाेण्यास मदत हाेईल. किसन नजनपाटील, निरीक्षक,बाजारपेठ
Áकर्मचारी संख्या अजूनही ताेकडी : बाजारपेठपाेलिस ठाण्यासाठी सन १९८१पासून १०३ कर्मचारी संख्या मंजूर अाहे. मात्र, प्रत्यक्षात या ठिकाणी फक्त ९० कर्मचारीच सेवा बजावत अाहे. कर्मचारी संख्या वाढीसाठी स्थानिक लाेकप्रतिनिधी जिल्हा प्रशासनाकडून ठाेस पाठपुरावा हाेणे शहराच्या सुरक्षेसाठी नितांत गरजेचे अाहे. पाेलिसांवर स्थानिक पातळीवर टाकला जाणारा राजकीय दबावही चर्चेचा अाहे.

चाैघांवर लवकरच एनपीडीएचा प्रस्ताव : बाजारपेठपाेलिस ठाण्याच्या हद्दीतील चार जणांवर एनपीडीएअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात अाला अाहे. संशयास्पद वाहनांची तपासणी करण्यासाठी नाकाबंदी करण्यावरही लक्ष केंद्रित करण्यात अाले अाहे. रात्रीची गस्तही अाता वाढवण्यात अाली असून स्वत: डीवायएसपी अाढावा घेत अाहेत.

रात्री १० वाजेनंतर दुकाने बंद करा : हाॅटेल्स,ढाबे, दुकाने व्यावसायिकांनी रात्री १० वाजेनंतर बंद करण्याच्या सूचना पाेलिसांनी दिल्या अाहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ५६ व्यावसायिकांवर रविवारी कारवाई करण्यात अाली. विनानंबर प्लेट, वाहन परवाना नसलेल्या २५ जणांवर साेमवारी दंडात्मक कारवाई करण्यात अाली. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले अाहे.


------------------------