आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र वाचून अाचरणात अाणा, पंचायत समितीचा संयुक्त उपक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शिवरायांचे चरित्र वाचून अाचरणात अाणा. संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी वाचन, चिंतन, मनन करा, असा सल्ला मान्यवरांनी अंतर्नाद प्रतिष्ठान पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे शिवजयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात अाली हाेती. या स्पर्धेचे पारिताेषिक वितरण रविवारी झाले, यात मान्यवर बाेलत हाेते. 
 
शहरातील चक्रधरनगरातील राेटरी हाॅलमध्ये हा कार्यक्रम झाला. उपनगराध्यक्ष युवराज लाेणारी, पंचायत समितीचे सभापती राजेंद्र चाैधरी, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, भाजप अनुसूचित जाती माेर्चाचे शहराध्यक्ष नीलेश रायपूरे, ज्येष्ठ रंगकर्मी वसंत देवळालकर, देवेंद्र वाणी, प्रा.डाॅ. शुभांगी राठी यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
 
पहिल्या गटात समज्ञा चिपळाेणकर (तु.स. झाेपे विद्यालय) प्रथम, हेमंत डाेके (गाडगेबाबा प्राथमिक शाळा) द्वितीय, मेहक चाैधरी (जिजामाता विद्यामंदिर) तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. दुसऱ्या गटात माेहन बऱ्हाटे (के. नारखेडे विद्यालय) प्रथम, दीपाली सराेसे (र.न.मेहता विद्यामंदिर) द्वितीय, श्रृती पिंगळेने (प.क.काेटेचा विद्यालय) तृतीय क्रमांक पटकावला. तिसऱ्या गटात साक्षी भटकर (अहिल्यादेवी कन्या विद्यालय) प्रथम, भावेश टाेंगळे (के.नारखेडे विद्यालय) द्वितीय, अंजली कानडे हीने (भुसावळ हायस्कूल) तृतीय क्रमांक पटकावला. 
 
अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी अहवाल वाचन केेलेे. प्रास्ताविक प्रकल्पप्रमुख देव सरकटे यांनी केले. समन्वयक डाॅ. जगदीश पाटील, अमित चाैधरी, निवृत्ती पाटील, अमितकुमार पाटील, अतुल चाैधरी, मंगेश भावे, हर्षल पाटील, श्रीकांत जाेशी, ऋषीकेष पवार, संजय ताडेकर, नीलेश गुरचळ, ज्ञानेश्वर घुले हे हाेते. सूत्रसंचालन संजय भटकर, प्रा. पंकज पाटील यांनी केले. अाभार प्रा. श्याम दुसाने यांनी मानले. कार्यक्रमाला पालकदेखील मोठ्या संख्येने हजर होते. 
चिमटा अन‌् हास्याचे फवारे 

‘समाजकारणात जेवढे चांगले काम कराल तेवढे माेठे हाेता येते. राजकारणात मात्र, माणूस डाेईजड झाला की त्याचा पत्ता केव्हा कट हाेईल हे सांगता येत नाही’, अशी काेपरखळी पंचायत समितीचे सभापती राजेंद्र चाैधरी यांनी नामाेल्लेख टाळून स्वकियांना मारली. त्यानंतर दाेन मिनिटे हास्याचे फवारे उडाले. त्यातून पंचायत समिती निवडणुकीत झालेल्या नाट्यमय घडामाेडींची अाठवणही अापसूक झाली. 
 
परीक्षकांचाही झाला गाैरव 
प्रा.शुभांगी राठी, प्रा. कुंदा चाैधरी, नरेंद्र महाले, ए.पी. पाटील, क्रांती वाघ, ऋषीकेष पवार, पाैर्णिमा राणे, अानंद सपकाळे, निवृत्ती पाटील, रवींद्र पाटील, उदय जाेशी, भाग्यश्री भंगाळे, सीमा भारंबे, सुनील वानखेडे, प्र.ह.दलाल यांचा परीक्षकांत समावेश हाेता. मान्यवराच्या हस्ते त्यांचाही सत्कार करण्यात अाला. शिक्षिका पाैर्णिमा राणे यांनी परीक्षकांतून तर स्पर्धकांतून साक्षी भटकर हीने मनाेगत व्यक्त केले. 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...