आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे: वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर 12 कॉपीबहाद्दरांवर केली कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
धुळे- बारावीच्या परीक्षे दरम्यान बुधवारी जिल्ह्यातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर १२ कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली. त्यात सर्वाधिक कारवाई माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांच्या पथकाने केली. 

बारावीचा बुधवारी विज्ञान शाखेचा रसायनशास्त्र तर कला शाखेचा इतिहासाचा पेपर झाला. त्यात सकाळी रसायनशास्त्राचा पेपर घेण्यात आला. या पेपरदरम्यान शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांच्या भरारी पथकाने पाटील माध्यमिक विद्यालय दहिवेल येथे परीक्षा केंद्राला भेट दिली. या केंद्रावर चार कॉपीबहाद्दरांना रंगेहात पकडण्यात आले. तर आर्वी येथील परीक्षा केंद्रावर सहायक शिक्षण संचालक गोविंद यांच्या पथकाने एक तर खेडे येथील परीक्षा केंद्रावर प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले यांच्या पथकाने एका कॉपीबहाद्दरावर कारवाई केली. 

दुपारच्या सत्रात कला शाखेचा इतिहास विषयाचा पेपर घेण्यात आला. या पेपरदरम्यानही बहुतांश परीक्षा केंद्रांवर कॉपी करण्यात येत हाेती. त्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी पाटील यांच्या पथकाने पिंपळनेर येथील आ. मा. पाटील माध्यमिक विद्यालय या केंद्रावर तीन तर न्यू इंग्लिश स्कूल साक्री येथील परीक्षा केंद्रावर दोन कॉपीबहाद्दरांवर कारवाई केली. तर श्री. गोविंद यांच्या पथकाने धुळे शहरातील महाजन हायस्कूल या परीक्षा केंद्रावर एका कॉपीबहाद्दरावर कारवाई केली. 
बातम्या आणखी आहेत...