आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘पालखी इंटरनॅशनल’चे सीसीटीव्ही फुटेज तपासले, आरोपींच्या जामिनावर सोमवारी सुनावणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सोहम जोशी अत्याचार प्रकरणात न्यायालयाने तिघा संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, तिघांनी जामिनासाठी अर्ज केल्याने शनिवारी न्या.ए.एम.मानकर यांच्यासमाेर सुनावणी झाली. सरकार पक्ष, बचाव पक्ष आणि त्रयस्थ पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला. याप्रकरणी साेमवारी निर्णय दिला जाण्याची शक्यता आहे.
संशयित आरोपींची चौकशी पूर्ण झाल्याचे तपास अधिकारी सुजाता राजपूत यांनी स्पष्ट केल्याने संबंधितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यामुळे संशयित आरोपी गणेश जगताप, गणेश धामणे योगेश चौधरी या तिघांनी जामिनासाठी अर्ज केला होता. शनिवारी न्या.ए.एम.मानकर यांच्यासमोर जामीन अर्जावर युक्तिवाद झाला.

हॉटेल पालखी इंटरनॅशनलमध्ये झालेल्या अवैध प्रकाराबाबत तपासी अधिकारी पाेलिस निरीक्षक प्रवीण वाडीले, पोलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील यांच्यासह तज्ज्ञांच्या पथकाने हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मात्र, तज्ज्ञांना जुना डेटा उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत.
हॉटेल पालखी इंटरनॅशनलमध्ये सोहम जोशी यास डांबून ठेवत त्याच्याकडून वेटरची कामे करवून घेण्यात आल्याची तक्रार त्याच्या आईने केली होती. पुरावे उपलब्ध व्हावे यासाठी रामानंदनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण वाडीले, उपनिरीक्षक दिलीप पाटील यांच्यासह आयटीशी संबंधीत तज्ज्ञांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास हॉटेलची पुन्हा तपासणी केली. एकुण १४ सीसीटीव्ही कॅमेरे लावेले असल्याची बाब निदर्शनास आली. या सर्व कॅमेऱ्यांमधून झालेले चित्रिकरण संग्रहीत होत असलेल्या युनिटची पथकाने तपासणी केली. मात्र, जुने चित्रिकरण आढळून आले नाही.