आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात रेल्वे गाड्यांची तपासणी, पठाणकोट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: जळगाव रेल्वे स्थानकावर रविवारी बरेली लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसची तपासणी करताना पोलिस कर्मचारी.
जळगाव - पठाणकोटमधील दहशतवादी हल्ला आणि दिल्ली-कानपूर रेल्वेत बॉम्ब ठेवल्याच्या अफवेमुळे देशभरात अतिसतर्कतेचे आदेश दिल्यानंतर जळगाव रेल्वे स्थानकावरही रविवारी प्रत्येक गाडीची कसून तपासणी करण्यात आली. जळगावात दुपारी वाजेनंतर आलेल्या प्रत्येक गाडीची रेल्वे पोलिस दल आणि बॉम्बशोधक नाशक पथकाने प्रत्येक डब्याची झडती घेतली.
त्यामुळे काही गाड्या उशिरा धावल्या तसेच तपासणीमुळे स्थानकावरही प्रवाशांची गर्दी होती.
पठाणकोटमध्ये शनिवारी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी लष्कराची कारवाई सुरू होती. त्यामुळे देशभरात पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले. त्यापाठोपाठ रविवारी सकाळी दिल्ली-कानपूर रेल्वेत बॉम्ब ठेवल्याचा फोन उत्तर रेल्वेला आल्यानंतर ही गाडी गाझियाबाद स्थानकावर थांबवून ठेवण्यात आली. रेल्वे पोलिसांनी गाडीच्या प्रत्येक डब्याची झडती घेतल्यानंतर कुणीतरी खोडसाळपणा करून बॉम्बची हूल उठवल्याचे लक्षात आले. मात्र, बॉम्बच्या अफवेनंतर देशभरातील रेल्वेस्थानकांनाही तत्काळ हाय अलर्ट बजावण्यात येऊन प्रत्येक गाडीच्या तपासणीचे आदेश दिले.

जळगावात दुपारी वाजेनंतर रेल्वे पोलिसांनी येणाऱ्या प्रत्येक गाडीची तपासणी करूनच त्या पुढे रवाना केल्या. सायंकाळी वाजून २७ मिनिटांनी येणाऱ्या बरेली-कुर्ला (लोकमान्य टिळक टर्मिनस ) गाडीचीही रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी तपासणी केली. या वेळी बॉम्बशोधक नाशक पथकही सोबतीला होते. सुमारे अर्धा तास या गाडीची कसून तपासणी करण्यात आली. त्यानंतरच गाडी मार्गस्थ झाली.
काही गाड्या उशिरा धावल्या
पोलिसतपासणी सुरू असल्याने लांबपल्ल्याच्या गाड्यांवरही त्याचा परिणाम झाला. काही गाड्या रविवारी उशिरा धावल्या. तसेच तपासणी सुरू असल्याने प्रवाशांचीही गर्दी झाली होती.