आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळयातील रसायनांचा बाजार हलेना!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- गतवर्षी झालेच्या दंगलीमुळे प्रकाशझोतात आलेले अँसिड, अल्कोहोलिक तसेच ऑइल व रंगांच्या धोकादायक व्यवसायाचा अद्यापही शहरातच ठिय्या आहे. वर्षभराच्या कालावधीनंतरही हे व्यवसाय शहराबाहेर हलविण्यात आलेले नाहीत. धोकादायक समजल्या जाणार्‍या या व्यवसायामुळे मोठे नुकसान होण्याची भीती कायम आहे. व्यवसाय शहराबाहेर काढण्यासाठी उपविधी मंजूर करण्यासाठी हरकती मागविण्यात आल्या होत्या. मात्र, मुदतीत एकही हरकत आली नाही. त्यामुळे हे व्यवसाय शहराबाहेर हलवायला एकप्रकारे संमती मिळाल्यासारखी स्थिती आहे. मात्र, अद्याप उपविधी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.

शहरात गल्लीबोळातून असे अनेक व्यवसाय सद्य:स्थितीत सुरू आहेत. यात कच्चा माल वापरून लहानमोठे उत्पादन केले जाते. काही ठिकाणी त्यासाठी भट्टय़ाही लावण्यात आलेल्या आहेत. तसेच लोखंड वितळणे, प्लास्टिक प्रक्रिया करणे, काचकाम, त्याचप्रमाणे अँसिडचाही वापर मोठय़ा प्रमाणात करण्यात येतो. वाहन, इन्र्व्हटर बॅटरीत या अँसिडचा वापर करण्यात येतो. ऑइल व गॅस याचाही अगदी सर्रास उघड्यावर उपयोग करण्यात येतो. आजूबाजूला उद्योग, दुकाने आणि रहिवासी भाग असल्याने ते नेहमीच धोक्याच्या सावटाखाली वावरत असतात. अशा प्रकारे या व्यवसायांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष व्यवस्था आणि काळजी या व्यावसायिकांकडून घेतली जात नसल्याचे चित्र पाहावयास मिळते. त्याचप्रमाणे अँसिड आणि ज्वलनशील पदार्थांचा मागील वर्षी झालेल्या दंगलीत सर्रासपणे वापर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. मंत्र्यांच्याही निदर्शनास ही बाब आल्याने त्यांनी असे उद्योग हे शहराबाहेर हलवावे, अशी शिफारस केली होती.

त्यानंतर या प्रकारचे धोकादायक उद्योग शहराबाहेर नेण्यात यावे यासाठी उपविधी तयार करण्यात आला. महापालिकेत यासंदर्भात ठराव करून त्याची प्रसिद्धी करण्यात येऊन उपविधी तयार करून त्यावर व्यावसायिक आणि नागरिकांच्या हरकती मागविण्यात आल्या होत्या. मात्र मुदतीच्या आत एकही हरकत प्राप्त झालेली नाही. त्यामुळे आता उपविधी शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येऊन तो अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.