आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chemical Mix Mango Danger For Health News In Divya Marathi

रासायनिक पदार्थांपासून पिकवलेले अांबे अाराेग्यास हानिकारक; गाेदामांच्या तपासणीचे अादेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - साडेतीनमुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला अांब्याला माेठ्या प्रमाणात मागणी हाेते. अक्षय्य तृतीयेला बाजारपेठेत अांबे विक्री करता यावे. यासाठी महाराष्ट्र अाणि परराज्यातून अाणलेल्या कैऱ्यांना रासायनिक पदार्थांच्या साहाय्याने पिकवले जाते. गेल्या वर्षी पालिका प्रशासन अाणि अन्न अाैषध प्रशासनाने केलेल्या कारवाईनंतर ही बाब उघड झाली हाेती. त्यामुळे अांबे घेण्यापूर्वी अापल्या कुटुंबाच्या अाराेग्याची काळजी घेणे गरजेचे झाले अाहे.

जळगाव शहरात अाणि जिल्ह्यात गेल्या वर्षी अशाच पद्धतीने रासायनिक पदार्थ टाकून अांबे पिकवताना अाढळून अाल्याने पालिकेच्या अाराेग्य विभाग अाणि अन्न अाैषध प्रशासनातर्फे कारवाई करण्यात अाली हाेती. या वेळीदेखील अशाच प्रकारे फळे पिकवली जाण्याची शक्यता असल्याने अन्न अाैषध प्रशासन विभागाचे सहायक अायुक्त बी.यू.पाटील यांनी जिल्हाभरात अांब्याची गाेदामे तपासणीचे अादेश दिले अाहेत. तपासणीदरम्यान घातक रसायनांचा वापर हाेत असल्याचे निदर्शनास अाल्यास वरिष्ठांनी दिलेल्या अादेशानुसार गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात अाले अाहेत. दरम्यान, प्रशासन अापल्या पातळीवर तपासण्या करत असले तरी ग्राहकांनीही यादृष्टीने जागरूक हाेणे गरजेचे अाहे.

पर्यायी अधिकाऱ्यांकडे जबाबदारी
अन्नसुरक्षा अधिकारी एस.व्ही.पांडे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले अाहेत. त्यामुळे पुढील अादेश हाेईपर्यंत अन्न सुरक्षा अधिकारी एस.एस.देवरे यांच्याकडे जळगाव शहराची अतिरिक्त जबाबदारी साेपवण्यात अाली अाहे. दरम्यान, अन्नधान्य, खाद्यपदार्थ, फळांचे नमुने तपासणी करण्याचे अादेश त्यांना देण्यात अाले अाहेत.

गंभीर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश
घातकरसायनांचा वापर करून अांबे पिकवली जातात. दरवर्षी अशाप्रकारे अांबे पिकवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत हाेती. मात्र, यापुढे एखाद्या व्यापाऱ्याने घातक रसायनांचा वापर करून अांबे पिकवल्याचे निदर्शनास अाल्यास भारतीय दंड विधायक कलम ३२८ अन्वये विष प्रयाेगाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश एफडीचे सहअायुक्त सुरेश देशमुख यांनी दिले अाहेत.

असे अाेळखा रसायनाने पिकवलेले अांबे
कैऱ्यापिकवण्यासाठी 'कॅल्शियम कार्बाइड'चा वापर करतात. रासायनिक पदार्थांचा वापर करून पिकवलेल्या अांब्यांचा वास गाेड येता उग्र स्वरुपाचा येताे. तसेच हिरवे अाणि पिवळ्या रंगाचे ठिपके दिसून येतात. रसायनांमुळे पिकवलेल्या अांब्याची वरची साल चमकदार अाणि पूर्ण पिवळी असू शकते. या उलट कृत्रिमरीत्या पिकवलेल्या अांब्याचा रंग पूर्ण पिवळा असला तर त्याच्या सालीला सुरकुत्या पडलेल्या असतात. नैसर्गिकरीत्या पिकवलेल्या हापूस अांब्याच्या देठाची जागा बेंबीप्रमाणे खाेलगट तर अाजूबाजूचा भाग उंच झालेला असताे.
- बी.एन.कापसे, फळबागतज्ज्ञ