आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसायनयुक्त सांडपाण्याने जळगावकरांच्या डोळ्यात होतेय जळजळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- अयोध्यानगर परिसरातील केमिकल कंपन्यांमध्ये वापरलेले रसायनयुक्त सांडपाणी नाल्यात सोडण्यात आल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रात्री 9 वाजेच्या सुमारास रहिवाशांना डोळ्याची जळजळ, उलट्यांचा त्रास झाला. गेल्या काही दिवसांपासून असा त्रास नित्याचा झाला असून बुधवारी याची तीव्रता अधिक जाणवल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
एमआयडीसीतील कंपन्यांमधील केमिकलमिर्शित सांडपाणी अयोध्यानगरकडे जाणार्‍या नाल्यात सोडण्यात येते. त्यामुळे या वाहत्या पाण्याचा नेहमीच त्रास जाणवतो. परंतु बुधवारी रात्री अचानक पाण्याची दुर्गंधी वाढली. श्वास घ्यायलाही त्रास होईल, अशी वासाची तीव्रता होती. नाल्यातून गॅस गळतीची भीती व्यक्त होऊ लागल्याने म्हाडा कॉलनीपासून सिद्धिविनायक कॉलनीपर्यंत या वासाची तीव्रता जाणवत होती. या नाल्याच्या परिसरात राहणार्‍या रहिवाशांना तर दरवाजे खिडक्या बंद करून स्वत:ला कोंडून घेण्याची वेळ आली होती. वासाची तीव्रता वाढतच गेल्याने अखेर नागरिक रस्त्यावर आले. गेल्या दोन वर्षांपूर्वी यासंदर्भात तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र कोणतीही दखल घेतली गेली नाही. बुधवारी पुन्हा नागरिकांनी या परिसरातून वाहणारा नाला बंदिस्त करावा, तसेच केमिकल कंपन्यांना सांडपाणी नाल्यात न सोडता त्याची विल्हेवाट अन्यत्र लावण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही केली आहे.
>नाल्यातून वाहणार्‍या पाण्याचा त्रास नित्याचा झाला आहे. आज तर त्रासाने परिसीमा गाठली असून मुलांना श्वास घ्यायलाही त्रास होतोय. संदीप सोमवंशी. 4 केमिकल कंपन्यांमधील पाण्याचा नेहमीच त्रास होतो. आता शरीरावर परिणाम होतो आहे. वासाने डोळ्यांची जळजळ होत आहे. दयाशंकर मिर्शा. 4 नाल्यातील सांडपाण्याचा विषारी वास येत आहे. त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होऊ लागला आहे. वृद्धांना तर घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. यापासून बचावासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केली जाणे गरजेचे आहे.
-वसंत महाजन