आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘चेन्नई एक्स्प्रेस’ साडीची क्रेझ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- चित्रपटातील फॅशन बाजारात यायला वेळ लागत नाही. सध्या महिलांच्या मनात चेन्नई एक्सप्रेस चित्रपटात दीपिका पदुकोनने घातलेल्या साडीने घर केले आहे. बाजारपेठेत ही साडी चेन्नई एक्सप्रेस नावाने प्रसिद्ध झाली असून जळगावातही ती दाखल झाली आहे. दीपिका पदुकोनने चित्रपटात घातलेल्या या साडीचा पूर्ण लूक हा दक्षिण भारतातील साडी प्रकारात मोडत असून याला वेस्टर्न पॅटर्नची जोड देण्यात आली आहे. साडीतील हेवी प्रकार 4 हजारांपासून ते 12 हजार रुपयापर्यंत उपलब्ध आहेत.

व्हेल्वेटचा पदर
या साडीचा पदर हा व्हेल्वेटचा असून पूर्ण साडी ही इटालियन जेकॉट प्रकारात असते. भरजरी असे हेवी काठ यात असून अनेक प्रकार यात उपलब्ध आहेत. काठात कुंदन वर्क सारखे निरनिराळ्या प्रकारचे वर्क केले असून पदर महिलांना जास्त आकर्षित करीत आहे. यात वाईन, मरुन, मस्टर्डसारखे रंग आहेत.

घागरा प्रकाराला मागणी
या साडीत इंडो-वेस्टर्न स्टाइलचा उपयोग करण्यात आला असून घागरा प्रकारात ही साडी घालता येते. परंतु घागर्‍याचा पदर हा गुजराथी पद्धतीचा असतो. मात्र या चेन्नई एक्सप्रेस साडीचा पदर हा महाराष्ट्रीयन पद्धतीचा सरळ असतो. यात नेटचा वापर केला आहे. तसेच पॅच वर्क केलेले आहे. यात पीच, गाजरी, पिंक, ब्लू, ग्रीन, रेड, मजेंडा सारखे रंग पाहायला मिळतात. तर क्रिम आणि मरुन रंगांची अधिक क्रेझ आहे.