आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शेवर्ले’च्या सेलने ‘सेडान’श्रेणीत चुरस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळागाव- स्पोर्टी लूक, स्पेशियस इंटिरिअर्स, नवीन डिझाइन आणि उत्तम मायलेज या गुणांसह शेवर्ले कंपनीची नवीन सेडान भारतात उपलब्ध झाली आहे. शहरातही या नवीन गाडीचे आगमन झाले आहे. अवघ्या पाच लाखांत उपलब्ध होणार्‍या या कारला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. शहरात एका आठवड्यातच 11 गाड्यांचे बुकिंग झाले आहे.

भारतात येण्यापूर्वी या गाडीने चीनमध्ये पसंती मिळविली. पुणे येथील प्लांटवर गाड्यांची निर्मिती सुरू आहे. मागणीनुसार उत्पादनात वेगाने वाढ होत आहे. सेडोन सेल मारुतीच्या स्विफ्ट डिझायर आणि टोयोटाच्या इटिऑस या मॉडेलशी स्पर्धा करेल. ग्राहकांच्या पसंतीनुसार तीनही प्रकाराच्या गाड्या सध्या मार्केटमध्ये अग्रस्थानी आहेत. सेल पेट्रोल आणि डिझेल दोनही प्रकारच्या इंधनांवर धावणारी गाडी आहे.

पेट्रोल इंजिन 1.2 लिटर 1199 सीसी तर डिझेल इंजिन 1.3 लिटर 1248 सीसी कॅपसीटीचे आहे. तीन महिने आधीच सेलचा हॅचबॅँक वोरिएंटेड ‘युवा सेल’ लॉँच करण्यात आला होता. त्याला योग्य प्रतिसाद मिळाला आहे. या गाडीच्या जमेच्या बाजूसह असमाधानकार फीसर्चही निदर्शनास येत आहेत. यात इंटिरिअर्सचे प्लास्टिक जास्त मजबूत दिसून येत नाही.

सीटिंग व्यवस्थेत स्पेस आहे. मात्र सीट्सच्या क्वॉलिटीत थोडी कमी जाणवते. पावर विंडो कंट्रोलला दरावाजांऐवजी ड्रायव्हर आणि को-पॅसेंजर यांच्यामध्ये असलेल्या मोकळ्या जागेत बसविण्यात आले आहे. जमेच्या बाजूमध्ये एवढय़ा किमतीत अशा प्रकारच्या सुविधा देणारे मॉडेल ग्राहकांना परवडणारे आहे. एप्रिलमध्ये शेवरले कंपनी ‘शेवर्ले एन्जॉय’ हे नवीन मॉडेल लॉँच करणार आहे. मारुती अटिंगा आणि टोयोटा इनोव्हा यांच्या स्पध्रेत एन्जॉय ग्राहकांना भावेल, अशी अपेक्षा कंपनीला आहे.

असे आहेत फीचर्स
> 370 लिटर्सचा बुट स्पेस
> टॉप मॉडेलमध्ये इंटिग्रेटेड ब्लूटूथ कनेक्टेड म्युझिक सिस्टम
> प्रत्येक मॉडेलमध्ये टिल्ट स्टेअरिंग
> मागील सीटाच्या खाली स्टोरेज स्पेस
> पेट्रोल मॉडेलमध्ये 18.2 तर डिझेलमध्ये 22.1 प्रति लिटर मायलेज
> एकाच वेळी पाच प्रवाशांचे मोबाइल फोन ब्लूटूथवर कनेक्ट करता येतात.
> इंजीन आणि गियरबॉक्सला पाच वर्षे किंवा 1.5 लाख किलोमीटरपर्यंतची वॉरंटी

एका आठवड्याच 11 गाड्यांची बुकिंग झाली आहे. भारतात अशा प्रकारचे फीचर्स असलेली ही पहिलीच कार आहे. इंजीन आणि गियरबॉक्सला वॉरंटी देण्यात आली आहे.
-प्रदीप गिरासे, वितरक, सोहम मोटर्स.

असे मॉडेल, अशा किमती
बेस: पेट्रोल 499000 डिझेल 629000
एलएस: पेट्रोल 549300 डिझेल 659300
एलएस एबीएस: पट्रोल 570300 डिझेल 680300
एलटी एबीएस: पेट्रोल 641550 डिझेल 751550