आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात डेंग्यूपाठोपाठ चिकुनगुन्याची साथ; 60 रुग्णांमागे 10 जणांना लागण, डॉक्टरांचा दुजोरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात उष्ण दमट वातावरण रोगराईचे माहेरघर झाले असून साथीच्या आजारांबरोबरच चिकुनगुन्याच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. ५०-६० रुग्णांमागे १० ते १५ रुग्ण चिकुनगुन्याचे अाढळून येत आहेत. यास डॉक्टरांनीही दुजोरा दिला. 
 
शहरात समाधानकारक पाऊस झालेला नाही. उलट ‘ऑक्टोबर हिट’ची स्थिती सप्टेंबरमध्ये जाणवत आहे. दमट आणि उष्ण वातावरणामुळे शहरात विविध आजारांनी डाेके वर काढले असून साथीच्या आजारांचा उद्रेक वाढतो आहे. या प्रामुख्याने टायफॉइड, मलेरियासारख्या आजारांचा समावेश आहे. मात्र, काही दिवसांपासून डेंग्यू पाठोपाठ चिकुनगुन्यानेही डोके वर काढले आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. बजरंग बोगद्याजवळील भोईटेनगर, मुक्ताईनगर परिसरात चिकुनगुन्याचा प्रादुर्भाव सर्वाधिक असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. 

दादावाडी परिसर, महाबळसह इतर भागातही चिकुनगुन्याचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, हा अाजार गंभीर स्वरूपाचा नसून तीन-चार दिवसांत उपचाराने बरा होणारा आहे; पण संसर्गामुळे ही साथ वाढण्याचा धोका नाकारता येत नाही, असे डॉक्टरांचे मत आहे. वातावरण बदलामुळे आधीच थंडी, तापाने रुग्ण वाढल्यामुळे डॉक्टरांच्या ओपीडीत रुग्णांना अक्षरश: रांगा लावाव्या लागताहेत. 
 
आठ-दहावर्षांपूर्वी मोठी साथ 
आठते दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्रभर चिकुनगुन्याची साथ आली होती. खान्देशातही रुग्णांची संख्या मोठी असून कुटुंबात एकापाठोपाठ एक चिकुनगुन्याने आजारी पडत होते. जळगावात आता रुग्णांची संख्या पाहता त्या वेळच्या स्थितीची आठवण होत आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये चिकुनगुन्याची साथ पसरली होती. हा आजार व्हायरल इन्फेक्शनमुळे होतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 
 
हवामान बदलामुळे सध्या ‘व्हायरल इन्फेक्शन’च्या रुग्णांची संख्या वाढली आहे; पण ते चिकुनगुन्याचे रुग्ण आहेत, असे म्हणता येणार नाही. जवळपास सर्वच रुग्णांना अंगदुखी, ताप, थंडी अशी लक्षणे दिसून येतात. 
- डॉ.गिरीश सहस्त्रबुद्धे 
 
उष्ण दमट हवामानामुळे वेगवेगळ्या आजारांनी डाेके वर काढले आहे. दिवसातून १५ ते २० रुग्ण चिकुनगुन्याचे दिसून येतात. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे ही साथ वाढण्याचा धोका आहे. त्याचबरोबर साथीचे आजार डेग्यूंच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. चिकुनगुन्या तीन-चार दिवसांत बरा होतो. पण सांधे, गुडघे दुखीच्या वेदना अनेक दिवसांपर्यंत राहतात. 
- डॉ. दीपक वाणी 

कोणती आहेत लक्षणे 
ताप,थंडी वाजून येणे. तोंड, पाठ, पाठीला पुरळ येणे. अंगाची हालचाल होणे. सांधे, गुडघे प्रचंड दुखणे. 
 
काय काळजी घ्यावी 
बाहेर जाताना तोंडाला रुमाल बांधणे. शिंकताना, खोकताना तोंडाला रुमाल बांधणे. संसर्गजन्य असल्यामुळे रुग्णांच्या संपर्कात जाणे. मधुमेह, हृदयविकार, दमा अन्य रुग्णांनी विशेष सतर्कता बाळगावी. 
 
 
बातम्या आणखी आहेत...