आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री, १२ मंत्री, ५० अामदार जळगावात- महाआरोग्य शिबिरासाठी शनिवारी येणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डझनभर मंत्री, ५० अामदार अाणि खासदारांचा ताफा जळगावात जानेवारीला दाखल हाेणार अाहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी अायाेजित केलेल्या महाअाराेग्य शिबिराच्या निमित्ताने हा ताफा जळगावात येणार अाहे. शिबिराचे अायाेजन करण्यात अालेल्या खान्देश सेंट्रलमध्ये जलसंपदामंत्री महाजन यांनी बुधवारी सायंकाळी पाहणी केली.

महाअाराेग्य शिबिराच्या निमित्ताने राज्यभरातील नामांकीत तज्ज्ञ डाॅक्टरांचा चमूही जळगावात येणार अाहे. जळगाव अाणि परिसरातील जिल्ह्यातील सुमारे ३५ हजार रुग्ण या शिबिराचा लाभ घेणार अाहे. गिरीश महाजन यांनी अायाेजित केलेल्या शिबिराचे नियाेजन अभ्यासण्यासाठी काही खासदार अाणि अामदारदेखील येणार अाहेत. जानेवारी राेजी महाशिबिराचे उद‌्घाटन हाेणार अाहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री उमा भारती, विधानसभा विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विविध १२ मंत्री शिबिराला उपस्थित राहणार अाहेत. जिल्ह्यासाठी अत्याधुनिक २० रुग्णवाहिका, शववाहिका यांचे लाेकार्पण करण्यात येणार अाहे.

जिल्हाभरात ३२००० रुग्णांची पूर्व तपासणी : महाआरोग्यशिबिरात उपचार शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णांची पूर्व तपासणी आणि नोंदणी केली जात अाहे. बुधवारअखेर जिल्हाभरातून ३२ हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी केली अाहे. शिबिराचे स्थळ सागर पार्क ऐवजी खान्देश सेंट्रल मॉल येथे करण्यात अाले अाहे. बुधवारी जलसंपदामंत्री महाजन यांनी पाहणी केली. बुधवारी एका दिवसात जळगाव शहरामध्ये हजार ७५१ रुग्ण तर ग्रामीण भागात हजार रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यात अाली. या शिबिरात जिल्हा रुग्णालय, डाॅ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, अार्किड हाॅस्पिटल येथे शस्त्रक्रिया केली जाणार अाहे. अनेक दुर्धर अाजारांवर या शिबिरात माेफत उपचार अाणि शस्त्रक्रिया केल्या जातील.

दुष्काळग्रस्त भागातही शिबिर घेऊ
राज्यातील दुष्काळग्रस्त भागातही महाअाराेग्य शिबिर घेण्यात येईल. तसेच या शिबिराच्या उद‌्घाटनप्रसंगी २० रुग्णवाहिकांचे लाेकार्पण केले जाणार अाहे. गिरीश महाजन, जलसंपदामंत्री

शिबिरासाठी पद्मश्रींसह ५०० डाॅक्टर येणार
शिबिरात४५० ते ५०० डाॅक्टरांचा ताफा सहभागी हाेईल. यात डाॅक्टर्स हे पद्मश्री पुरस्कार प्राप्त अाहेत. या शिबिरात गरज भासल्यास अत्याधुनिक रुग्णवाहिकेमध्ये उपग्रहाद्वारे तज्ज्ञ डाॅक्टर मार्गदर्शन करतील. या रुग्णवाहिका जळगावसाठी लाेकार्पण करण्यात येणार अाहेत.

सलमान खानकडून अडीच काेटींची मदत
जळगावातहाेत असलेल्या महाअाराेग्य शिबिरासाठी सिनेअभिनेता सलमान खान याने तब्बल अडीच काेटी रुपयांचे अर्थसहाय्य केले अाहे. महाशिबिराचा खर्च यातून भागवला जाणार अाहे. शिबिरातून गरीब गरजू रुग्णांना मदत केली जाणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...