आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील पावसामुळे मुख्यमंत्र्यांचा दाैरा पुढे ढकलला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मुंबईत शुक्रवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शुक्रवारचा नियाेजीत जळगाव दाैरा एक दिवस पुढे ढकलण्यात अाला अाहे. शनिवारी सकाळी ९.१५ वाजता मुख्यमंत्र्यांचे जळगाव विमानतळावर अागमन हाेणार अाहे. जैन हिल्स येथे अायाेजित जलसंपदा विभागाच्या कार्यशाळेला उपस्थित राहण्यासह जलयुक्त शिवार अभियानातील कामांची पाहणी, विविध शासकीय विभागांच्या अाढावा बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहतील.
जैन हिल्स येथे शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता जैन इरिगेशनच्या कार्यक्रमाचे उद‌्घाटन केल्यानंतर सकाळी १०.३० वाजता गांधीतीर्थ येथे अायाेजित जलसंपदा विभागाच्या कार्यशाळेला मुख्यमंत्री हजेरी लावतील. दुपारी १२.४० वाजता शिरसाेली येथे साठवण बंधाऱ्याच्या कामांची पाहणी करतील. दुपारी १.१५ वाजता जळके येथे नाला खाेलीकरण कामाची पाहणी, दुपारी वाजता पाचाेरा तालुक्यातील लाेहारा येथे कामांची पाहणी ग्रामस्थांशी संवाद साधतील. दुपारी ३.२० वाजता देव्हारी तर दुपारी वाजता कंडारी येथे कामाची पाहणी ४.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अाढावा बैठक घेतील. संध्याकाळी ५.४५ वाजता नागपूर येथे जाणार अाहेत.
बातम्या आणखी आहेत...