आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला खडसेंची दांडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मानापमानावरून शनिवारी जिल्हा बैठकीत उफाळून आलेल्या भाजपमधील गटबाजी, अंतर्गत कलहाचा रविवारी मुख्यमंत्र्यांनाही प्रत्यय आला. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमास माजी महसूलमंंत्री एकनाथ खडसे यांनी दांडी मारली. खडसेंसोबतच खासदार रक्षा खडसे, भुसावळचे आमदार संजय सावकारे आणि आमदार गुरुमुख जगवानी यांनीदेखील जामनेरला जाण्याचे टाळले, तर प्रोटोकॉलच्या कात्रीत सापडलेल्या जिल्हाध्यक्ष उदय वाघ, महानगराध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे आणि जिल्हा संघटनमंत्र्यांंनी ऐनवेळी जामनेरला धाव घेत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचा सोपस्कार पार पाडला. दरम्यान, खडसे यांनी जामनेरला जाण्याचे टाळले; मात्र तत्पूर्वी विमानतळावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी पाच मिनिटे कानगोष्टी केल्या. त्या वेळी आमदारांनी मिळत असलेली अपमानास्पद वागणूक, जिल्हा भाजपतील अंतर्गत कलह आणि एकंदर राजकीय परिस्थितीची कल्पना खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना दिली, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
बॅनरवरील फाेटाेंवरून नाराजीनाट्य
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जामनेर शहरातील विविध विकास कामांचे उद््घाटन करण्यात अाले. यानिमित्ताने जामनेर शहरात स्वागताचे बॅनर लावण्यात अाले हाेते. यात माजी महसूलमंत्री खडसेंसह खासदार रक्षा खडसे खडसे समर्थक अामदारांचे फाेटाे वापरण्यात अाले नसल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे अाहे.

शासकीय कार्यक्रमावर नाराजी कसली?
^मुख्यमंत्र्यांचे स्वागत केल्यानंतर त्यांच्याशी मराठा क्रांती माेर्चासंदर्भात चर्चा करून भेट घेण्याची विनंती केली. गर्दी असल्याने खास अशी काही चर्चा करता अाली नाही. जामनेर येथे नगरपालिकेचा कार्यक्रम होता . ताे काही पक्षाचा कार्यक्रम नव्हता. शासकीय कार्यक्रमाबाबत काही नाराजीचा विषय नसताे. त्यामुळे बहिष्काराचा प्रश्न येत नाही; परंतु जामनेरात बॅनर हाेर्डिंगवरील फाेटाेंवरून अामदारांमध्ये नाराजी दिसते. एकनाथ खडसे, माजी महसूलमंत्री

‘सीएम’ला नाही, ‘जीएम’ला विरोध
दरम्यान, खडसे समर्थक आमदार सावकारे यांनी या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करताना अत्यंत सूचक विधान केले. आमचा विरोध सीएमला नसून जीएमला असल्याचे सावकारे म्हणाले. जामनेर येथील विकास कार्यक्रमाबाबत छापण्यात आलेल्या पत्रिकांवरील नावांवरून खडसे समर्थक आमदारांमध्येही तीव्र नाराजी आहे. त्याबाबत खडसे यांनीही दुजोरा दिला अाहे. आमदार सावकारे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांचा भ्रमणध्वनी बंद हाेता.

खडसेंसह आमदार ‘मुक्ताई’वर परतले
मुख्यमंत्रीजामनेरला रवाना झाल्यानंतर खडसे, आमदार सावकारे, भोळे, जगवानी, स्मिता वाघ तसेच खासदार रक्षा खडसे विमानतळावरून थेट मुक्ताई बंगल्यावर परतले. तेथे त्यांची बराचवेळ खलबते झाली. आमदारांचे भ्रमणध्वनी या वेळी बंद होते. नंतर जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार भोळे, आमदार स्मिता वाघ यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेला हजेरी लावली तर खडसे यांच्यासह खासदार रक्षा खडसे, आमदार सावकारे, जगवानी यांनी दांडी मारली.

भाजपचे नेते तथा मुख्यमंत्री फडणवीस हे जिल्हा दाैऱ्यावर अालेले असताना पक्षाच्या अंतर्गत वादातून जिल्हाध्यक्ष उदय वाघ महानगर अध्यक्ष अामदार भाेळे यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याची चर्चा सुरू झाली. एकीकडे मुख्यमंत्री, तर दुसरीकडे माजी महसूलमंत्री अशा कात्रीत सापडलेल्या जिल्हाध्यक्षांनी खडसेंसाेबत राहणे पसंत केल्याची वार्ता पसरली. जळगाव येथील विमानतळावरून थेट जामनेरला जाता वाघ भाेळे यांनी खडसेंसाेबत त्यांच्या बंगल्यावर पाेहोचले. त्यानंतर पुन्हा जामनेरला मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू हाेण्याच्या वेळेस जिल्हाध्यक्ष जिल्हा संघटक व्यासपीठावर पाेहोचले.

जिल्हाध्यक्ष पाेहोचले शेवटच्या क्षणी
विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केल्यानंतर माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे त्यांचे समर्थक थेट जळगावातील ‘मुक्ताई’ बंगल्यावर पाेहाेचले. त्यामुळे खडसे जामनेरच्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचा निराेप मिळताच बऱ्याच कार्यकर्त्यांनी बंगल्याकडे धाव घेतली. यात खासदार रक्षा खडसे, अामदार जगवानी, अामदार सावकारे, अामदार भाेळे, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, जिल्हा संघटनमंत्री किशाेर काळकर, अनिल भाईदास पाटील, सुनील नेवे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रभाकर पवार, मनाेहर पाटील, पालिकेचे गटनेते सुनील माळी, चेतन शर्मा, अमित चाैधरी अादींचा समावेश हाेता.

विमानतळावरून थेट ‘मुक्ताई’ बंगल्यावर
भाऊ, जामनेरला जायचे का?
चर्चेनंतर खडसे यांनी मुख्यमंत्र्यांचा निरोप घेतला. मुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्री महाजन एकाच वाहनाने जामनेरला रवाना झाले. या प्रसंगी खडसे समर्थक आमदार सावकारे, सुरेश भोळे, स्मिता वाघ, जगवानी आपसात चर्चा करत होते. खासदार रक्षा खडसेही उपस्थित होत्या. स्मिता वाघ यांनी या प्रसंगी खडसे यांना विचारले, ‘भाऊ जामनेरला जायचे काय करायचे?’, मात्र, खडसे यांनी त्याला उत्तर दिले नाही. त्यामुळे स्मिता वाघ यांनी पुन्हा-पुन्हा खडसे यांना हाच प्रश्न विचारला मात्र त्यांना उत्तर मिळाले नाही.

बातम्या आणखी आहेत...