आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chief Minister Take Resignation Of Corrupted Ministers Supriya Sule

मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचारी मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत, सुप्रिया सुळेंची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - देवेंद्र फडणवीसांना अाम्ही अभ्यासू समजत हाेतो. विराेधात असताना त्यांनी अाघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचे अाराेप केले, राजीनाम्याची मागणी केली. मात्र, अाता मुख्यमंत्री झाल्यानंतर ते त्यांच्या भ्रष्ट मंत्र्यांची पाठराखण करीत अाहेत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव अाहे. मुख्यमंत्र्यांनी अजूनही भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घेऊन त्यांची नि:पक्षपणे चाैकशी करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी जळगावात पत्रकारांशी बाेलताना केली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (मुंबई) यांच्यातर्फे जैन हिल्स येथे अायाेजित ‘शेती अाणि अाधुनिक तंत्र’ या विषयावरील कार्यशाळेसाठी सुळे जळगावात अाल्या हाेत्या. या वेळी त्यांनी भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. अाघाडी शासनाने १५ वर्षे एकाेप्याने सरकार चालवले. इकडे मात्र भाजप-सेनेच्या सत्तेत सहा महिन्यांतच एकमेकांचे खटके उडाले. राज्यातील मंत्र्यांवर गंभीर अाराेप अाहेत. भाजपचे शासन असलेले राज्य भ्रष्टाचाराच्या अाराेपांनी बरबटले अाहे. मध्य प्रदेश येथील व्यापमं घाेटाळा, राज्यातील विविध घाेटाळ्यांसंदर्भात येत्या अधिवेशनात तारांकित प्रश्न विचारणार अाहे. पंतप्रधान माेदींनी निवडणुकीत भ्रष्टाचारविरहित शासनाचा डंका पिटला हाेता. मात्र, आता सत्तेत आल्यानंतर त्यावर काहीही होताना दिसत नाही. त्यासंदर्भात त्यांना जाब विचारणार अाहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील दुष्काळाची स्थिती फारच विदारक अाहे. मात्र, भांडणामध्ये रमलेले सरकार शेतकऱ्यांप्रती मुळीच गंभीर नाही. लाेकसभेत यासंदर्भातदेखील बाेलणार असल्याचे खासदार सुळे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.