आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाडीचा कट लागल्याने लहान मुलासह दांपत्याला मारहाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: दुचाकी वाहनाला धडक देऊन महिलेला मारहाण केल्याप्रकरणी मनीष शहा यांना जिल्हापेठ ठाण्यात नेताना पाेलिस.
जळगाव - अाकाशवाणी चाैकाकडून बहिणाबाई उद्यानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी वाहनाचा कट लागल्याने चार ते पाच जणांनी दांपत्यासह लहान मुलाला मारहाण केल्याची घटना घडली अाहे. याप्रकरणी जिल्हापेठ पाेिलसांनी चाैकशीसाठी शहा पिता-पूत्रांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

अाकाशवाणी चाैकाकडून संताेष बाबुराव जाधव (रा.पिंप्राळा) हे पत्नी कल्याणी जाधव अाणि मुलगा सुयश (वय ३) हे त्यांच्या माेटारसायकलने (एमपी-०४-एनडी-४०२) जात हाेते. नवजीवन सुपरशॉपकडून मनीष छबिलदास शहा कुणाल अक्षय शहा हे हाेंडा अॅक्टिव्हा गाडीवर निघाले. जाधव यांच्या बाजूला कार असल्याने शहा यांच्या गाडीला त्यांचा कट लागला. शहा अाणि ते जणांनी जाधव दांपत्य मुलाला मारहाण केली, अशी तक्रार जाधव यांनी जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात दिली अाहे. याप्रकरणी पाेलिसांनी मनीष अाणि कुणाल यांना पोलिस ठाण्यात नेेऊन चाैकशी केली. याप्रकरणी जाधव यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.