आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Child Dead In Borewell, Chargesheet Filed Against Farm Woner

बोअरवेलमध्ये मुलाचा मृत्यू, शेतमालकावर गुन्हा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर - तालुक्यातील तांदळी येथील एका शेतातील बोअरवेलमध्ये पडून तीनवर्षीय भटूचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी संबंधित शेतमालकावर मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोअरवेल्समध्ये पडल्यानंतर भटूला बाहेर काढण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने 24 तास शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र, त्याला वाचविता आले नाही. या प्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती; परंतु शेतमालक हिंमत गोकुळ पाटील यांनी ही बोअरवेल्स उघडी ठेवल्यामुळेच भटूचा बळी गेला. त्यामुळे शेतमालकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले होते. त्यानुसार रविवारी पोलिस उपनिरीक्षक मधुकर साटोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिंमत पाटील (रा.तांदळी) यांच्याविरुद्ध भटू याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.