आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकीच्या उपचारामुळे चिमुकल्याचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सुप्रीम काॅलनीतील १७ महिन्यांच्या चिमुकल्याचा चुकीच्या उपचारामुळे शनिवारी दुपारी १.१५ वाजेच्या सुमारास मृत्यू झाल्याचा अाराेप मृत मुलाच्या नातेवाइकांनी केला. या प्रकरणी दाेन हाॅस्पिटलमध्ये दाेन वेगवेगळ्या अाजारांवर उपचार करण्यात अाल्याचे समाेर अाले अाहे. मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे येथे पाठविण्यात अाला अाहे.
सुप्रीम काॅलनीतील तन्मय गाेपाल भावरे (वय १७ महिने) याला ताप येत असल्याने ३१ डिसेंबरला हाॅटेल राॅयल पॅलेसच्या बाजूला असलेल्या डाॅ. राजेश शिंपी यांच्या अमेय हाॅस्पिटलमध्ये घेऊन गेले.

चुकीचे उपचार
^तन्मयला सुरुवातीलाडाॅ. शिंपी यांच्याकडे त्यानंतर चिराग हाॅस्पिटलला दाखल केले हाेते. मात्र, दाेन्ही ठिकाणी वेगवेगळे अाजार असल्याचे सांगितले. चुकीच्या उपचारामुळेच तन्मयचा मृत्यू झाला अाहे. महेश कळसकर, चिन्मयचे मामा

कावीळची लागण
^तन्मयची प्रकृती गंभीर हाेती. तपासणी केल्यानंतर त्याला कावीळ झाल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर अाधीच तापाचा इलाज केलेला हाेता. त्याचा पाय सुजल्यामुळे पायात सेफ्टिक झाले अाहे किंवा नाही? याची तपासणी केली. मात्र, पायात सेफ्टिक नव्हते. डाॅ. अविनाश भाेसले, प्रभारी,चिराग हाॅस्पिटल