आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालमृत्यू प्रकरण : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गेल्यावर्षभरात सिव्हिल रुग्णालयात ४४० बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी त्रिसदस्यीय चौकशी समितीने पाच डॉक्टर, दोन सिस्टर इन्चार्ज आणि एक ऑपरेटर यांच्यावर ठपका ठेवला आहे. दरम्यान, दोषी आढळून आलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी केली आहे. मात्र, नाशिकचे आरोग्य उपसंचालक बी.डी.पवार यांनी चौकशी अहवालावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
गुप्ता यांनी माहितीच्या अधिकारातून मिळवलेल्या माहितीनुसार हे प्रकरण चर्चेस आले होते. चौकशी सुरू असताना गुप्ता यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अर्ज करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, हा विषय पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षेत्रात येत नसून संबंधित डॉक्टरांची वरिष्ठांकडून चौकशी झाल्यानंतर चौकशीत दोषी आढळून आल्यास तशी कुणी तक्रार दिल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे त्यांना पोलिसांकडून कळवण्यात आले होते.
आता हे प्रकरण आरोग्य उपसंचालकांसमोर आहे, तेथून चौकशी अहवालाचे अवलोकन झाल्यानंतरच कारवाईच्या हालचाली करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातून पाठवण्यात आलेल्या अहवालात तीन डाॅक्टरांचा हलगर्जीपणा उघड झाला आहे.