आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जामनेरात बालकाचा मृत्यू; घराची तोडफोड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर - येथील मदनीनगरातील अयानखान साजीदखान या सात वर्षीय बालकाच्या मृत्यूप्रकरणी अल्पवयीन आतेभाऊच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. सोमवारी मृताच्या कुटुंबीयांनी तक्रार दिली नसल्याने पोलिसांच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र, घडल्या प्रकारामुळे संतप्त समाजबांधवांनी दफनभूमीतच संशयिताच्या वडिलांसह कुटुंबीयांना मारहाण केली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.

अयानखान हा शनिवारी सायंकाळपासून बेपत्ता होता. नातेवाइकांनी शोधाशोध करून पोलिसांनाही कळवले. दरम्यान, काही समाजबांधवांच्या चर्चेदरम्यान अयानखानला शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता त्याच्या आतेभावासोबत बुलेटवर बोदवड रोडकडे जाताना पाहिले; तर काहींनी बोदवड रोडवरील एका शेतात विहिरीजवळ बुलेट उभी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रविवारी रात्री एक वाजेदरम्यान ते शेत गाठून विहिरीत डोकावले असता त्यांना अयानचा मृतदेह आढळला. रात्रीच मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला. रविवारी सकाळी शवविच्छेदन करून दफनविधी करण्यात आला.

दबावाचा आरोप
रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. याबाबत मयताच्या कुटुंबीयांवर दबाव येत असल्याचा आरोप आहे. यामुळे संतप्त जमावाने संशयिताच्या घराची तोडफोड केली. घरावर दगडफेक करण्यात आली. या घरातील मंडळीला आत बंद केलेले होते. याबाबत कळताच पोलिस निरीक्षक नजीर शेख, विशाल पाटील, बारकू जाने अन्य पोलिसांनी घटनास्थळ गाठले. जमावास समजवत परिस्थिती नियंत्रणात आणली.

समाजबांधवांनी दिले निवेदन
संशयितहा वाईट प्रवृत्तीचा आहे. याच कारणावरून त्यास गेल्या वर्षी इयत्ता नववीच्या वर्गातून काढून टाकले, अशी माहिती काही समाजबांधवांनी पत्रकारांना दिली. अयानचा खून हा अनैसर्गिक कृत्याच्या कारणातून झाला असावा, असा संशय व्यक्त करून दोषीला कठोर शिक्षेची मागणी निवेदनातून पोलिस निरीक्षक नजीर शेख यांच्याकडे करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...