आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने गेला चिमुरडीचा जीव, इतर तीन जण जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी काढलेल्या मिरवणुकीदरम्यान ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने सुप्रीम कॉलनीतील रुचिता दिलीप सावळे (वय १४) या बालिकेचा मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाले हाेते. मृत रुचितास कुटुंबीयांसह परिसरातील रहिवासी लाडाने चिंगी नावाने हाक मारीत असत. सुप्रीम कॉलनीत डाॅ. अांबेडकर जयंतीनिमित्त १३ आणि १४ राेजी नागरिकांमध्ये उत्साह होता. दोन्ही दिवस चिंगी तिच्या मैत्रिणींसह धम्माल करीत होती. सर्वच बच्चे कंपनी डान्स करण्यात मग्न होते. मंगळवारीही मिरवणुकीच्या तयारीत ती उत्साहात होती. रात्री घडलेल्या घटनेनंतर मात्र परिसर सुन्न झाला आहे. बुधवारी दुपारी वाजेच्या सुमारास रुचितावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी नातेवाइकांसह परिसरातील नागरिकांना शोक अनावर झाला होता.

सुप्रीम कॉलनीतून दरवर्षी मिरवणूक निघते. मात्र, मिरवणूक परिसरातच फिरत असे. यंदा प्रथमच रेल्वे स्थानकाजवळ मिरवणूक आणली अाणि ही दु:खद घटना घडली. बुधवारी यातील जखमी कोकिळा तायडे यांना गणपती हॉस्पिटलात हलवल्यानंतर मृत रुचिताचा लहान भाऊ याने देखील अापल्या ताईला गणपती हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ, अशी आर्त हाक दिली.
प्रकृती चिंताजनक असल्याने तायडे खासगी रुग्णालयात दाखल
अपघातातनिकिता गवई (वय १५), गोकर्णाबाई म्हस्के (वय ५५) कोकिळा तायडे (वय ३५) ह्या ितघे जखमी झाल्या आहेत. दरम्यान गोकर्णाबाई निकिता यांची प्रकृती बुधवारी स्थिर हाेती. तर कोकिळा तायडे यांना गणपती हॉस्पिटलच्या अतिदक्षता िवभागात हलवण्यात आले आहे. जखमी निकिता ही मृत चिंगीची मैत्रीण शेजारील रहिवासी अाहे. तिने बुधवारी उपचारादरम्यान वारंवार चिंगीची आठवण काढली.
एकुलती मुलगी होती रुचिता
रुचिताचेवडील दिलीप सावळे मूळ सोलापूर जिल्ह्यातील आहेत. वर्षभरापूर्वीच त्यांचे कुटुंब जळगावी स्थायिक झाले. कुटुंबात रुचितासह दोन भाऊ आहेत. दोघा भावांची ती एकटीच बहिण होती. सावळे हे अजूनही सोलापूरलाच कामाला आहेत. ते महिन्यातून एक-दाेन वेळा जळगावी येतात. आई हातमजुरी करते. अपघात झाला तेंव्हाही ते सोलापूरलाच होते. बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ते जळगावात पोहाेचले. त्यानंतर अंत्यसंस्कार केले.
काॅलनीत मैत्रिणींची लाडकी
रुचिताही सुप्रीम कॉलनी परिसरात असलेल्या शारदा माध्यमिक विद्यालयात सहाव्या वर्गात शिकत होती. दरम्यान तिला इंग्रजी चांगल्या प्रकारे वाचता येत होते, असे तिच्या मैत्रिणींनी अावर्जून सांगितले. आंबेडकर जयंतीनिमित्त तिने नवीन ड्रेसही घेतला होता. हा ड्रेस घालून सोमवारपासून ती मैत्रिणींमध्ये मिरवत होती, बागडत होती. अचानक झालेल्या या घटनेमुळे आता मैत्रिणींसह नागरिकांना बागडणारी ती चिंगी आठवणीत राहुन गेली.