आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुमारी मातेशी विवाह; जोडप्याला संसारोपयोगी ७५ भांडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विवाहबद्ध झालेले अंध युवक मुन्तजिम खान आयेशा हबीब गवळी. - Divya Marathi
विवाहबद्ध झालेले अंध युवक मुन्तजिम खान आयेशा हबीब गवळी.
जळगाव- शहरातीलएका अंध युवकाने कुमारी मातेशी विवाह (निकाह) करून नवा अादर्श निर्माण केला आहे. जिल्हा पत्रकार संघाच्या पद्मश्री भवरलाल जैन सभागृहात मंगळवारी हा विवाह पार पडला. जात आणि धर्म या पलीकडे मुस्लिम समाजात या तरुणाने माणुसकीचे दर्शन घडवून आणले आहे.

शहरातील आयेशा हबीब गवळी अंध युवक मुन्तजिम खान असे या जोडप्याचे नाव आहे. स्त्रियांच्या दुर्बलतेचा गैरफायदा घेऊन बळजबरीने अत्याचार केले जातात; अशाच प्रकारे बळजबरी करून मातृत्व त्या कुमारी मातेवर लादले गेले होते. घरची गरिबीची परिस्थिती असल्याने ती अत्याचाराची बळी ठरली आणि यातूनच तिच्यावर मातृत्व लादले गेले. गराेदरपणापासूनच तिचे पालकत्व फारुख शेख यांनी स्वीकारले.

तिला जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्त्रीराेग प्रसूती विभागात दाखल करून डॉ.नम्रता अच्छा डॉ.उदयसिंग पाटील यांच्या सहकार्याने तिची प्रसूती करण्यात आली होती. आज तिला तीन वर्षांची मुलगी आहे. त्या चिमुकलीचे पालकत्व स्वीकारून त्या युवकाने समाजाला संदेश दिला आहे.

पत्रकार संघाच्या पद्मश्री भवरलाल जैन सभागृहात हा विवाह झाला. या वेळी पत्रकार संघाचे अशोक भाटिया, ज्येष्ठ पत्रकार दिनेश दगडकर उपस्थित होते. डॉ.अमिर साेहेल यांनी माहिती दिली. मौलाना नुरानी मशिद, शाहूनगरचे मौलाना अख्तर नदवी यांनी निकाहपठण केले. गवाह म्हणून बशीर खान नजीर खान, याकूब खान दाऊद खान हे हाेते. फारुख शेख यांनी हा विवाह घडवून आणला.

पत्रकार संघात विवाह, आहेरासाठी यांचेही सहकार्य
आयेशालासुमारे ७५ भांडी, कपाट, आभूषण, कपडे आदींचा आहेर करण्यात आला. यासाठी हाजरा शेख, युनूस चप्पलवाला, वाहेद मनियार, शकील शेख पिंजारी, सय्यद करीम मनियार, अशोक भाटिया, प्रा.अनिता कोल्हे, मीना अळवणी, उमा देशमुख, निवेदिता ताठे, पूनम पाटील, मनीषा बागुल, सुरेखा रडे, अंजली पाटील, अफजल अय्येकार यांचे सहकार्य मिळाले.