आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाच्या खूनप्रकरणी बापाला केली अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पती-पत्नीच्या वादात झालेल्या मुलाच्या खुनाच्या घटनेत आरोपी प्रमोद चव्हाण यास शनिपेठ पोलिसांनी जिल्हा रुग्णालयातून सोमवारी ताब्यात घेतले. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
शहरातील तळेले कॉलनीतील प्रमोद चव्हाण व त्याची पत्नी मीनाक्षी यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद होऊन त्यात वीरेंद्र चव्हाण या बालकाचा मृत्यू झाला होता. मुलाचा मृत्यू झाल्यानंतर प्रमोद यानेदेखील आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याची तब्येत अत्यवस्थ असल्याने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर रविवारी शनिपेठ पोलिसांनी दुपारी त्यास ताब्यात घेतले. त्यास मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. प्रमोदकडून अनेक मुद्यांवर माहिती घेणे बाकी असल्याने विचारपूस करणे गरजेचे आहे म्हणून पोलिस कोठडी मागणार आहेत.