आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायदा हातात घेत अल्पवयीन चोरास अमानुषपणे मारहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - भुरट्या चोर्‍या करणार्‍या चार अल्पवयीन (सुमारे 10 वर्षाची मुले) चोरट्यांनी बुधवारी दुपारी 11 वाजेच्या सुमारास तायडे गल्लीत चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब परिसरातील काही नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चौघा मुलांपैकी एकाला पकडले तर तीन मुले पळण्यात यशस्वी झाली. यानंतर नागरिकांनी त्या अल्पवयीन चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात न देता सुमारे दीड तास अमानुषपणे मारहाण केली. ही घटना कळल्यानंतर नागरिकांनी मुलाला केलेल्या मारहाणीबाबत संताप व्यक्त करण्यात आला.

गेंदालाल मिल भागातील हे चारही चोरटे होते. त्यांनी तायडे गल्लीतील अमृत सोनवणे यांच्या घरासमोर ठेवलेला पाण्याचा हंडा, कळशी आणि बादली चोरीचा प्रय} केला होता. चोरट्यांच्या हातात वस्तू असतानाच त्यांना काही जणांनी पाहिल्यावर हटकले. त्यामुळे यातील तीन चोरटे पळून गेले तर एक अल्पवयीन मुलगा नागरिकांच्या हातात लागला. त्यांनी सुरुवातीला त्याला घराबाहेरच्या पलंगाला बांधून मारहाण केली. त्याच्या अंगावर पाणी टाकले. एवढय़ावरच न थांबता घरातील पाळीव कुत्रा त्याच्या अंगावर सोडून त्याला घाबरवण्याचा प्रय} केला. वास्तविक नागरिकांनी या मुलाला पोलिसाच्या ताब्यात द्यायला हवे होते; पण नागरिकांनीच कायदा हातात घेऊन मुलाला बदडले.
मारहाणीमुळे मुलगा बेजार
चोरीचा बेत फसल्यानंतर मुलाला नागरिकांनी दिलेल्या वागणुकीमुळे तो अत्यंत बेजार झाला. सुमारे दीड तास त्याच्यासोबत अमानुषपणे अत्याचार केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. नागरिकांची त्याला सोडण्याची इच्छा नव्हती. मात्र मार पडल्यामुळे या मुलाने जोरजोरात आरडाओरड केली. त्याच्या आवाजामुळे परिसरातील इतर नागरिकांना काहीतरी सुरू असल्याचा भास झाला. त्यामुळे नागरिकांनी त्याला दीड तासानंतर सोडून दिले.

पोलिसांत तक्रारही नाही
4चोर पकडल्यानंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित आहे. संतापाच्या भरात थोडे मारल्यानंतर नागरिकांनी चोरट्याला पोलिसांच्या स्वाधीन केले पाहिजे होते. मात्र या संदर्भात नागरिकांनी पोलिसांत कोणत्याही प्रकारची नोंद केलेली नाही. भाऊसाहेब पटारे, पोलिस निरीक्षक, जिल्हापेठ पोलिस ठाणे