आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाटील दांपत्याकडून बाल कल्याण समितीने अखेर परत घेतले बाळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - टाटिया शिशुगृहातून आणलेल्या साई या बाळाला बाल कल्याण समितीने मंगळवारी दुपारी ४.३० वाजता पाटील दांपत्याकडून परत घेतले. अडीच महिने सांभाळल्यानंतर बाळाला परत देताना सोनल पाटील यांनी हंबरडा फोडला. त्यांना अश्रू अनावर झाले होते. ‘माझ्या बाळाला परत द्या हो...’अशी अार्त विनवणी त्या समितीकडे करत हाेत्या. सायंकाळी वाजता बाळाला तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, पुनर्वसनाचा निर्णय होईपर्यंत बाळ सिव्हिलमध्येच राहणार असल्याचे समितीने सांगितले.

टाटिया शिशुगृहातून अाणलेल्या बाळाला बाल कल्याण समितीकडे सुपूर्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर मंगळवारी दुपारी वाजता अॅड. नथ्थू पाटील साेनल पाटील हे बाल निरीक्षणगृहात हजर झाले हाेते. या वेळी समितीच्या अध्यक्षा वृषाली कोल्हे, सदस्य मीना काळे, प्रा. वाय.जी.महाजन, डॉ. नीरज देव उपस्थित होते. थाेड्यावेळानंतर जिल्हापेठ पाेलिस ठाण्याचे दिलीप पाटील हे इतर कर्मचारी आले. त्यांनी समितीने बाळाला हजर करण्याबाबत पाटील दांपत्याला सूचना केली. या वेळी सोनल पाटील यांनी ‘माझ्या बाळाला परत घेणार नाही ना? अशी शंका उपस्थित केली. आम्ही त्याचा व्यवस्थित सांभाळ केला आहे. त्याचा वैद्यकीय खर्च केला आहे. पुढेही सांभाळ करायला तयार आहोत, असे ते समितीला वारंवार सांगत हाेत्या. रडून-रडून त्यांचे डोळे सुजले होते. अडीच महिने बाळाला वागवल्यानंतर समितीसमोर सादर करताना त्यांच्यातील आईचे हृदय द्रवले. टाटिया शिशुगृह व्यवस्थापनाकडून तुमच्यावर झालेल्या अन्यायाबाबत आम्ही वृत्तपत्रामधून वाचले आहे. त्याबद्दल आम्हाला तुमच्याबद्दल सहानुभूती आहे. मात्र, बाळ दत्तक देण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्याची जबाबदारी बाल कल्याण समितीची आहे. त्याला समितीसमोर हजर करा. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया होईल, असे समितीच्या सदस्यांनी पाटील दांपत्याला सांगितले. त्यानंतर पाटील दांपत्य साईला आणण्यासाठी त्यांच्या घरी गेले.

दुपारी ४.३० वाजता साईला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात अाले. या वेळी जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी रमेश काटकर, जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुबेर चवरेही उपस्थित होते. सायंकाळी वाजता पोलिसांनी साईला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. या वेळी सोनल पाटीलही त्यांच्यासोबत होत्या. मात्र, जिल्हा रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ उपस्थित नव्हते. त्यामुळे कुबेर चौरे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांशी संपर्क साधून बालरोगतज्ज्ञांना बोलावण्याची विनंती केली.

बाळाचा ताबा देण्याबाबत अर्ज
अडीच महिन्यांच्या कालावधीत आम्हाला साईचा लळा लागलेला आहे. भविष्यात आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही पूर्ण होईपर्यंत बाळाचा ताबा आमच्याकडे देण्यात यावा, या आशयाचा अर्ज पाटील दांपत्याने बाल कल्याण समितीला मंगळवारी दिला. अानंदराज मानकलाल टाटिया शिशुगृह यांच्याकडून १५ एप्रिल रोजी साई नावाचे बाळ मिळालेले आहे. या बाळाची वैद्यकीय इतर सर्व काळजी आम्ही माता-पित्याप्रमाणे घेत आहोत. त्याची नियमित वैद्यकीय काळजी सुरू आहे. हे बाळ घेण्यापूर्वी आम्ही ‘कारा’कडे नोंदणी केलेली अाहे. त्या अनुषंगाने टाटिया शिशुगृह यांच्याकडे त्याची वैद्यकीय तपासणी केलेली होती. शिशुगृहाने काराच्या निर्देशाप्रमाणे होमस्टडीसुद्धा केलेली आहे. अमळनेर पोलिस ठाण्याकडून २३ जून रोजी घेतलेला अंतिम अहवाल सादर केलेला आहे. आपल्या आदेशाप्रमाणे साईला आपल्यासमोर हजर करीत आहोत. त्याची आम्ही संपूर्ण निगा घेतलेली आहे. भविष्यातसुद्धा त्याची संपूर्ण निगा काळजी घेऊ. त्याबद्दल संपूर्ण जबाबदारी आमचीच राहील. बाळाचे मानसिक शारीरिक हित लक्षात घेऊन त्याचा ताबा आम्हाला देण्यात यावा, असे पाटील दांपत्याने अर्जात नमूद केले आहे.
१५ दिवसांत पुनर्वसनाचा निर्णय घेणार
पाटील दांपत्याने बाळाला समितीसमोर हजर केले अाहे. वैद्यकीय तपासणी करून त्याला पोलिसांनी सिव्हिलमध्ये दाखल केले. टाटिया शिशुगृहासंदर्भात तक्रारी असल्याने त्याला तेथे ठेवण्यात येणार नाही. पुढील निर्णय होईपर्यंत बाळ सिव्हिलमध्येच ठेवण्यात येणार आहे. येत्या १५ दिवसांत पुनर्वसनाचा निर्णय घेण्यात येणार अाहे. प्रा.डॉ.वाय.जी.महाजन,सदस्य बाल कल्याण समिती
अत्यंत वाईट दिवस
अाजचा दिवस अामच्यासाठी अंत्यत वाईट ठरला. बाळ अामच्यापासून दूर गेले. ते परत मिळणार नाही असे वाटते. बाळाला अाम्ही अडीच महिने सांभाळले मग दिवस सांभाळू शकलाे नसताे का? अॅड.नथ्थू पाटील
बातम्या आणखी आहेत...