आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - ताणतणाव आणि कौटुंबिक दूषित वातावरणामुळे टीनएर्जसचे आत्महत्येकडे वळण्याचे प्रमाण वाढले आहे. याकडे पालक व्यस्त शेड्यूलमधून मुलांना किमान अर्धा तासही देऊ शकत नसल्यामुळे ही स्थिती निर्माण होत आहे. टोकाच्या भूमिकेपर्यंत पोहचण्यापूर्वी मुले बर्याचदा काही गोष्टी आईवडिलांना सांगण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्याकडे लक्ष न दिल्यामुळे तणावाचे प्रमाण अधिकच वाढत जाते, असे चित्र समोर आले आहे.
एकीकडे मुलांवर शिक्षणाच्या ओझ्याबरोबरच इतर अँक्टिव्हिटीची सक्ती केली जाते. त्यामुळे दिवसभरातील व्यस्त नियोजनातून मुलांना मनमोकळेपणासाठी वेळ उरत नाही. त्यातच पालकांच्या ‘बिझी शेड्यूल’मुळे त्यांचा मुलांशी संवाद फारच कमी होतो. यामुळे मुले एक्कलखोर होत असून ते तणावाखाली जीवन जगत आहेत. अभ्यासाच्या ओझ्यामुळे मुलांना आलेला ताण कमी करण्यासाठी ते आई-वडिलांशी संवाद साधण्याचा प्रय} करतात.
परंतु वेळेअभावी आई-वडील त्यांना वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे मुले तणावात जाऊन त्यांची मानसिकता आत्महत्येकडे प्रवृत्त होते आहे. पालकांनी मुलांशी मित्रत्वाचे संबंध ठेवून दररोज किमान अर्धा तास मुलांशी संवादासाठी वेळ द्यायला हवा. त्यातून मुलांवरील तणाव काहीसा कमी करण्यास मदत मिळू शकते, असे जाणकारांचे मत आहे.
अपयश पचवायला शिकवा
लहानपणापासून पालक मुलांना नकार, दु:ख, अपयश यापासून दूर ठेवतात. त्यांची प्रत्येक अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मुलांच्या मानसिक सार्मथ्याचा विकास होत नाही. मानसिक बळ वाढत नाही. अशा वातावरणात वाढल्यानंतर मोठेपणी अचानक आलेले अपयश, दु:ख किंवा नकार मिळाल्यावर मुले खचून जाऊन आत्महत्येचा विचार करतात. यासाठी त्यांना लहानपणापासून या गोष्टीची सवय लावली पाहिजे.त्यांची क्षमता ओळखून अपेक्षा ठेवल्या पाहिजे. संवाद ठेवावा. तणावाची लक्षणे आढळल्यानंतर आवश्यक असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. मानसिक बळ देणे सर्वात आवश्यक आहे. डॉ.कीर्ती देशमुख, मानसोपचार तज्ज्ञ.
मुलांवर त्यांच्या बौद्धिक पातळीपेक्षा अधिक जबाबदारी सोपविणे चुकीचे आहे. त्यामुळे घरातील दबाव आणि ताणतणाव कमी करण्यासाठी वाईट सवयींच्या आहारी जाण्याचे प्रमाण अलीकडे वाढत आहे. त्यातून आत्महत्येकडे वळण्याची प्रवृत्ती बळावते आहे. मुलांना मनाप्रमाणे आवडी-निवडीचे अधिकार दिले पाहिजे. वेळोवेळी पालकांनी याविषयी मार्गदर्शन करावे. वाय.डी. पाटील, पोलिस निरीक्षक
पालकांसाठी सूचना
> मुलांच्या शाळेतील शिक्षक आणि वसतिगृहातील वॉर्डन व अन्य कर्मचार्यांच्या संपर्कात रहा.
> मुलांना आवश्यक तेवढेच पैसे द्यावेत. अनावश्यक पैसे देणे टाळावे.
> मुलगा कुणाकडून उसनवारीने पैसे तर मागत नाही ना याची खात्री करावी.
> चांगल्या मित्राप्रमाणे सातत्याने संवाद सुरू ठेवावा.
मुलांवर असावी नजर
> मुलाला अभ्यासापेक्षा जास्तवेळ मित्रांमध्ये राहणे पसंत करतो का हे पहावे.
> रात्री उशिरापर्यंत फेसबुक अथवा मोबाइलवरून मित्रांशी गप्पा मारतो का
> आपण सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिडेपणा करतात का
> रात्री उशिरापर्यं घरी येणे.
नोट : यातील एकही लक्षण आपल्या मुलामध्ये असेल तर तो वाईट सवयीच्या आहारी जाऊ शकतो. याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे.
टीनएजरसाठी सूचना
> जेवढा पैसा असेल तेवढा खर्च करावा.
> चुकीच्या गोष्टींपेक्षा आपला अभ्यास व करिअरकडेच लक्ष केंद्रित करावे.
> मोटिवेशनल कार्यक्रमात सहभागी झाले पाहिजे.
केस - गुळवे विद्यालयात नववीत शिकणार्या भावना चौधरी हिने जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. आईवडिलांचे छत्र हरपल्यामुळे तिच्यावर हा प्रसंग ओढवला. वसतिगृहात राहत असताना तणावात येऊन तिने आत्महत्या केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.