आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालदिनी सजले वर्ग, स्वच्छ झाल्या शाळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - चाटे किड्सतर्फे फॅन्सी ड्रेस स्पर्धा झाली. फॅन्सी ड्रेस स्पर्धेची थीम प्राणी संग्रहालय होती. मुलांनी ‘मैं जंगल का राजा हूँ,’,‘ मेरी ताकद देखो’,‘ सेव्ह दी टायगर्स’,‘ ससा तो ससा’ सारख्या वेशभूषेसह संवादही घेतले. या वेळी संस्थेच्या संचालिका प्रेमलता खटाेड, मुख्याध्यापिका रेणुका भावसार उपस्थित होते. स्पर्धेत प्ले ग्रुपमध्ये स्वरा कोटकार, श्रेया जगताप, हार्दिक तळेले, आेम ठाकूर, शिवम खटाेड, सुधांशू पाटील, हुजैर खान, अक्षरा गुले, आरव चौधरी यांनी तर नर्सरी, ज्युनियर केजी, सीनियर केजी ग्रुपमध्ये अक्षरा नाहाटा, मोहित लोढे, मोहित पाटील, अनुश्री संघवी, अनुष्का शिंपी, निशांत वाघ, वेदांत सैंदाणे, कुंज भावसार, हिमांसी प्रजापती यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत लहान गटात प्रथम हुजैर खान, द्वितीय शिवम खटाेड, तृतीय आेम ठाकूर तर मोठ्या गटात प्रथम निशांत वाघ, द्वितीय अनुष्का शिंपी, तृतीय मोहित पाटील यांना पारितोषिके देण्यात आली.
‘दिव्य मराठी’ कार्यालयात बालदिनी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी जादूचे प्रयोग हा कार्यक्रम झाला. या वेळी प्रयोग दाखवताना राजू तडवी अजिश तडवी.

विद्यानिकेतनमध्ये स्वच्छतेची शपथ
जिल्‍हापरिषद विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य बी. एस. भावसार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. सी. एस. चौथे यांनी पंडितजींच्या व्यक्तिमत्त्वाचे अनोखे पैलू मुलांना सांगितले. विद्यार्थ्यांना स्वच्छता आरोग्यविषयक शपथ देण्यात आली. एस.बी.महाले, आय.एस.वाघ यांनी घनकचरा व्यवस्थापन टाकाऊतून टिकाऊ उपयुक्त साहित्य निर्माण करण्याबाबत चर्चा घडवून आणली. तसेच १७ नोव्हेंबर रोजी निबंध पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
येथेही झाले कार्यक्रम
इकराशाहीन विद्यालय, मनपा शाळा क्र. ३८, जनार्दन सुका खडके प्राथमिक विद्यामंदिर, प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल, बचपन स्कूल, िववेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल, रत्ना जैन प्राथमिक विद्यालय, शां.ल.खडके प्राथमिक शाळा, बहिणाबाई प्राथमिक माध्यमिक विद्यालय, अभिनव प्राथमिक विद्यालय, आर.आर.विद्यालय, महात्मा गांधी विद्यालय, प्रगती विद्यामंदिर, प्रगती बालवाडी, ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, इकरा पब्लिक स्कूल, न्यू इंग्लिश मीिडयम स्कूल.

"मी नेहरू बोलतोय' नाटिका सादर
गुरुवर्यपरशुराम विठोबा पाटील विद्यामंदिर शाळेत स्वच्छता अभियान राबवण्यात आले, नंतर बालसभा घेण्यात आली. या वेळी बालकांनी गाेरे गाेरेपान, बच्चे मन के सच्चे या गाण्यांवर नृत्य सादर केले. त्यानंतर ‘मी नेहरू बाेलतोय’ ही नाटिका सादर करण्यात आली. शाळेतर्फे मुलांना कडुनिंब, िलंब, सप्तपर्णी, हिरडा, कदंब, जांभूळ, पेरू, तुळस यांची रोपे वाटण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापिका रेखा पाटील, चंद्रकांत भंडारी उपस्थित होते.

गुळवेविद्यालयात मार्गदर्शन
पुष्पावतीगुळवे विद्यालयात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका हेमलता पाटील होत्या. या वेळी विद्यार्थ्यांना शिक्षक पी. एस. माळी यांनी नेहरूंचा राजकीय काळ स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची माहिती दिली. डी.आर.माळी यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी एस. एस. राजपूत, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

रोझलॅण्डशाळेत वर्गसजावट स्पर्धा
रोझलॅण्डप्राथमिक विद्यामंदिरात भाषण, निबंध, वर्गसजावट स्पर्धा झाल्या. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका मीना पाटील होत्या. याप्रसंगी तिसरी ते वीच्या विद्यार्थ्यांनी भाषणात सहभाग घेतला. पहिली ते वीच्या विद्यार्थ्यांतर्फे वर्गाची आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात आली होती. या वेळी शाळेच्या खोल्या परिसर स्वच्छ करण्यात आला.

ज्ञानसाधना विद्यामंदिरात भाषण
ज्ञानसाधनाप्राथमिक विद्यामंदिरात संस्थाध्यक्ष पांडुरंग काळे, सचिव ज. वा. रोटे यांनी नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांनी भाषणांचे सादरीकरण केले. दीपमाला भोपे यांनी माहिती दिली. मुख्याध्यापिका राजश्री महाजन उपस्थित होत्या. आमदार सुरेश भोळे यांनी शैक्षणिक साहित्य वाटप केले.

जैनविद्यालयात स्वच्छतेबाबत माहिती
शेठबी.एम.जैन विद्यालयात मुख्याध्यापिका ज्‍योती भोरडिया अध्यक्षस्थानी होत्या. विद्यार्थ्यांना स्वच्छता आरोग्यविषयक शपथ देण्यात आली. स्वच्छतेचे महत्त्वदेखील मुलांना सांगण्यात आले. या वेळी संुदर वर्ग खोलीची स्पर्धा घेण्यात आली, यामध्ये तिसरी चौथी वर्गांना उत्कृष्ट वर्ग घाेषित करण्यात आले. तसेच निबंध स्पर्धा झाली. अविनाश पाटील यांनी सूत्रसंचालन तर भूपेंद्र अहिरे यांनी आभार मानले.

किलबिलबालक मंदिरात कार्यक्रम
किलबिलबालक मंदिरात ‘फुलासारखे छान चाचा नेहरू’ हे गीत सादर करीत चाचा नेहरूंना आदरांजली अर्पण करण्यात आली. या वेळी संस्थेचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी, मंजूषा चौधरी, रत्नप्रभा कुरकुरे उपस्थित होते.

हॅपी मुव्हमेंट रेडिओ क्लब रोटरी क्लब वेस्टतर्फे बालदिनानिमित्त रोटरी हॉल येथे ‘वह समय गया है’ ही नाटिका चिमुरड्यांनी सादर केली. नाटिकेतील प्रत्येक प्रसंगाने सभागृह थक्क झाले होते.

"मी नेहरू बोलतोय' नाटिका सादर
गुरुवर्यपरशुराम विठोबा पाटील विद्यामंदिर शाळेत स्वच्छता अभियान राबवण्यात आले, नंतर बालसभा घेण्यात आली. या वेळी बालकांनी गाेरे गाेरेपान, बच्चे मन के सच्चे या गाण्यांवर नृत्य सादर केले. त्यानंतर ‘मी नेहरू बाेलतोय’ ही नाटिका सादर करण्यात आली. शाळेतर्फे मुलांना कडुनिंब, िलंब, सप्तपर्णी, हिरडा, कदंब, जांभूळ, पेरू, तुळस यांची रोपे वाटण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापिका रेखा पाटील, चंद्रकांत भंडारी उपस्थित होते.