आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी रस्ता चुकलेला मुलगा सायंकाळी घरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अमळनेर तालुक्यातील चौबारी येथून चुकून जळगावात पोहोचलेल्या वर्षीय बालकाला जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी बसस्थानकातून ताब्यात घेऊन त्याच्या कुटंुबीयांकडे पोहोचवले. शुक्रवारी बालदिनाच्या दिवशीच ही घटना घडली. राज मोतीलाल शिंदे असे या बालकाचे नाव आहे.

राजचे आई-वडील सुरत शहरातील पालनपूर पाट्या जकातनाका येथे राहतात. तो शिक्षणासाठी त्याच्या मावशीकडे चौबारी येथे राहतो. शुक्रवारी सकाळी त्याला चौबारी येथून कुणीतरी एसटी बसमध्ये बसवले. तो दुपारी १२ वाजेच्या सुमारास जळगाव बसस्थानकावर उतरला. कुणीही ओळखीचे दिसत नसल्यामुळे तो भेदरलेल्या अवस्थेत फिरत होता. दरम्यान, बसस्थानकावर ड्यूटीस असलेले सहायक पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार इंगळे हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील यांनी राजला हेरले. त्याच्यासोबत कुणीच नसल्यामुळे त्यांनी त्याला जवळ बोलावून घेतले. भेदरलेला राज काहीच बोलत नव्हता. पोलिसांनी परिसरात तपास केला, मात्र कुणीही राजला ओळखत नव्हते. अखेर त्याच्यासोबत गप्पा मारून त्याला बाेलते केले. राजने कागदावर त्याचे नाव, वडिलांचे नाव लिहून दिले. त्यावरून अमळनेर पोलिस ठाण्यात कळवून राजच्या मावशीचा शोध घेण्यात आला.

पोलिसांनी दाखवली सतर्कता
राजलाबसमध्ये कुणी बसवले, हे तो सांगू शकत नव्हता. तसेच जळगाव स्थानकावरही त्याला कुणीच ओळखत नव्हते. अशा अवस्थेत काही विपरीत घडण्याआधीच इंगळे आणि पाटील या पोलिस कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत राजला बोलते केले. त्याला चिवडा, वेफर्स खाण्यासाठी देऊन गट्टी जमवली. त्यांच्या सतर्कतेमुळेच बालदिनी राज घरी सुखरूप परतू शकला.
मावशीसह नातेवाइकांना पाहून राजला झाला आनंद बसमधूनउ तरताच राजने बसस्थानकात काही युवकांशी बोलून आपल्याला सुरत गाडीत बसवून देण्याचे सांगितले. मात्र, कुणीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही. पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याच्याशी गट्टी जमवून त्याच्याकडून नाव, गाव लिहून घेतले. अमळनेर पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी चौबारी येथील राजच्या मावशीशी संपर्क साधला. सायंकाळी वाजेच्या सुमारास मावशीसह काही नातेवाईक जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आले. बाकावर बसून वेफर्स खाणाऱ्या राजकडे पाहून सर्वांचेच डोळे पाणावले. राजनेही नातेवाइकांना पाहून आनंद व्यक्त करीत, परतीचा मार्गावर िनघून गेला.