आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाटकाचे धडे गिरवत केला नाट्यप्रयोग सादर, प्रशिक्षण बारकाव्यांसह विकासाबाबतही मुलींना मार्गदर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित २० दिवसीय बालनाट्य शिबिराचा समाराेप ‘हे जीवन सुंदर अाहे’ या नाट्यप्रयाेगाने करण्यात अाला. मुलींनी नाटकाचे धडे घेत हा प्रयाेग सादर केला.
शिवाजीनगरातील हरिजन छात्रालय वसतिगृहात हे शिबिर झाले. त्यात मान्यवरांसह नाटक संगीत क्षेत्रातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मुलींना नाटकातील बारकाव्यांसह व्यक्तिमत्त्व विकासाबद्दल धडे दिले. या शिबिरात ग्रामीण भागातील मुलींचा सहभाग जास्त हाेता.
शिबिराचे समन्वयक अाणि मार्गदर्शक म्हणून शहरातील ज्येष्ठ बालनाट्य दिग्दर्शक ज्ञानेश्वर गायकवाड यांनी काम पाहिले. सांस्कृतिक कार्य संचालनालय नागपूरच्या संचालिका अलका तेलंग या वेळी उपस्थित होत्या. शिबिरासाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय (मुंबई)चे संचालक अजय अांबेकर, मनाेज सानप, मच्छिंद्र पाटील, जळगावचे चिन्मय संत, गायत्री चव्हाण, भाग्यश्री बनसाेडे, सुधाकर पाटील अादींचे सहकार्य मिळाले.

37 मुलींनी सादर केले ‘हे जीवन सुंदर अाहे’
20 दिवस नाटकाचे घेतलेले प्रशिक्षण शुक्रवारी ३७ मुलींनी मंचावर उतरवले. ‘विद्यार्थी’ अापला धर्म अाणि ‘शिक्षण’ हे कर्तव्य अाहे. अापल्या अाई-वडिलांना अापण कसेही चालताे. मग अपंग असाे वा चांगले. मेरीटचा हट्ट असताे ताे केवळ पाेटापाण्यासाठी, असा संदेश मुलींना या नाट्यप्रयाेगातून दिला.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे अायाेजित २० दिवसीय बालनाट्य शिबिराचा समाराेप शुक्रवारी झाला. त्यात ‘हे जीवन सुंदर अाहे’ हे नाटक करताना विद्यार्थिनी.

शिबिरातून शिकवण
व्यक्तिमत्त्वविकास कशा प्रकारे घडवायचा. आयुष्यात मोठ्या पदावर जायचे असेल तर आधी चांगला माणूस आपण बनायला हवे, ही महत्त्वाची शिकवण या शिबिरातून मला मिळाली. साधनातडवी, विद्यार्थिनी.

सुखामागूनदु:ख हे येतच असतेच; पण त्याला हसत-खेळत कसे सामोरे जायचे, हे शिबिरात शिकवण्यात आले. फक्त नाटकाचेच धडे नाही तर कविता, गाणे हेदेखील आम्हाला येथे शिकवण्यात आले. मला याची आधीपासूनच आवड होती, त्यामुळे मला आता जरी नाटकात काम करण्याची संधी मिळाली तरी ते मी करेन. वैशालीचव्हाण, विद्यार्थिनी

बालनाट्य सादर
शिबिरातआशा फाउंडेशनचे ‘वाजवणार कोण’ हे विनय सुरवसे निर्मित दिग्दर्शित बालनाट्याचा प्रयोग विद्यार्थिनींना दाखवण्यात आला. शिवाजीनगर परिसरातील मुलांनी मिळून हा प्रयोग सादर केला.

नाट्यांगांची माहिती
भैरवीपुरंदरे, अंजली धारू, उमेश घेवरीकर, साक्षी ज्याेतिंग, ज्ञानेश्वर जाेशी, मनाेज गवई, भाऊसाहेब पाटील, अमरसिंग राजपूत, चिंतामण पाटील, दुष्यंत जाेशी, शंभू पाटील, वासंती दिघे, अविनाश पाटील, डी.एस.कट्यारे अादी तज्ज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले. त्यात नाट्यांगांची माहिती देऊन नाटकात काेणत्या गाेष्टींची गरज असते, अभिनय कसा करावा, भावना लाेकांपर्यंत कशा पाेहाेचाव्यात अादीबाबत सांगितले. अंजली धारू यांनी वेशभूषा कशी असावी, नाटकात काम करताना घ्यायची काळजी, उच्चार, मंचावर देहबाेली कशी असावी हे सांगितले. साक्षी ज्याेतिंग यांनी ‘पिंटी’ हा एकपात्री प्रयाेग मुलींसमाेर सादर केला.