आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरचीने साठी पार केल्याने तिखटाची चलती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - खाता क्षणी डाेळे आणि नाकातून पाणी आणणार्‍या झणझणीत हिरव्या मिरचीच्या दरानेही सर्वांच्याच तोंडचे पाणी पळवले आहे. भाव गगनाला भिडल्याने हिरवी मिरची कचिनमधून गायब झाल्याचे चित्र सध्या आहे. किलोला ६० ते ८० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे गृिहणीने हिरव्या मिरचीएेवजी लाल तिखटला पर्याय म्हणून निवडले आहे.

आयात घटल्याने भाव वाढले
यंदा सर्वत्र सरासरीपेक्षा कमी पडलेल्या पावसाचा परिणाम मिरचीच्या उत्पादनावर झाला आहे. काही दिवसांपूर्वी ३० ते ४० रुपये किलो दराने मिळणारी हिरवी मिरची आज ६० ते ८० रुपये किलोने विकत घेण्याची वेळ नागरकिांवर आली आहे. मागणीपेक्षा आवक कमी झाल्याने भाव गगनाला भिडले आहेत.
ये‌थून होते मिरचीची आवक
जळगावच्या बाजारपेठेत नािशक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, बीडसह गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातून आवक होते. मात्र, उत्तरेत सध्या पाण्याने कहर केला आहे. तर राज्यात कमी पावसामुळे उत्पादन घटल्याने आवक मोठ्याप्रमाणावर घटली आहे.

पुरवठ्यावर नियंत्रण नाही
काेणत्या जिल्ह्यात किती मिरचीचा पुरवठा झाला पािहजे, यावर काेणाचेही नियंत्रण नाही. एखाद्या ठिकाणी भाव जास्त मिळाला तर सर्वच शेतकरी तेथेच माल पाठवतात. त्यामुळे दुसरीकडे पुरवठाच होत नाही. त्यामुळेही भाव वाढतात.
आत्माराम माळी, अध्यक्ष, भाजीपाला आडत असाेिसएशन