आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिनी मालावर व्यापारी महामंडळाचा बहिष्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- भारत,पाकिस्तान आणि चीन या तिन्ही देशांच्या संबंधाबाबत सोशल मीडियावरून चर्चा सुरू आहे. अखेर या संदेशाचा मुद्दा व्यापारी महामंडळाने हेरून चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शनिवारी शहरातील व्यापारी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन चिनी मालाच्या खरेदी-विक्रीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चिनी मालाच्या ६० कोटी रुपयांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर परिणाम होईल.

चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय यापूर्वीच भारतातील अनेक जिल्ह्यांमध्ये घेण्यात आला आहे. याच धर्तीवर जिल्हा व्यापारी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक झाली. त्यात चिनी माल खरेदी-विक्रीवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याचा ठराव करण्यात आला. चीन हा देश पाकिस्तानच्या मदतीने भारत विरोधी कारवाया करीत आहे. या गोष्टीला प्रत्येक भारतीयांचा राग आहे. त्यामुळे आपण थेट बॉर्डरवर युद्ध करता चिनी मालाची खरेदी-विक्री बंद करून देखील विरोध दर्शवू शकतो, असे मुद्दे बैठकीत उपस्थित करण्यात आले. या बैठकीला महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा पदाधिकारी उपस्थित होते.
या मालावर पडेल अधिक फरक
मोबाइल,लायटिंग, दिवे, फटाके, खेळणी या प्रमुख वस्तुंच्या विक्रीवर मोठा फरक पडेल. त्या पाठोपाठ इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, हार्डवेअर यांचा समावेश असेल, अशी माहिती व्यापार क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...