आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर चायनीज खाण्यापूर्वी बस्स, 2 मिनिटे विचार करा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगावकरांनो,शहरातील चायनीज खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्यांवर चटकदार चायनीज खात असाल तर सावधान. कारण यात आरोग्यास हानी पोहचवणाऱ्या अजि -नो-मोटो (मोनोसोडियम ग्लुटामेट) या पदार्थाचा वापर केला जात आहे. हा धक्कादायक प्रकार ‘दवि्य मराठी’च्या चमूने बुधवारी शहरात चायनीज विक्रेत्यांच्या हातगाड्यांच्या पाहणीनंतर समोर आला आहे. दुसरीकडे अन्न औषध प्रशासनाने (एफडीए) शासनास सादर केलेल्या एका अहवालात चक्क शहरातील चायनीज हातगाड्यांवर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये अजि-नो-मोटोचा वापर होत नसल्याचे म्हटले आहे.

राज्यात ऑगस्टपासून अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ लागू झाला असून त्याची अंमलबजावणी प्रशासनामार्फत विविध स्तरावर केली जात आहे. त्या अनुषंगाने मुंबईत करण्यात आलेल्या कारवाईत १८०० चायनीज हातगाड्यांवरील खाद्यपदार्थांमध्ये अजि-नो-मोटो हा पदार्थ आढळून आला होता. त्यानंतर शासनाने अन्न औषध प्रशासनाच्या जळगाव कार्यालयाकडून परवानाधारक चायनीज विक्रेते, परवाना नसलेले विक्रेते, वेळोवेळी होणारी तपासणी याबाबत माहिती मागवली होती. दरम्यान, रस्त्यावरील चायनीज गाड्यांसदर्भात विधान परिषदेत लक्षवेधी उपस्थित करण्यात आली आहे. त्यानुसार राज्याच्या नगरविकास विभागाने महापालिकेकडे शहरातील गाड्यांची माहिती मागवली आहे. या पार्श्वभूमीवर ‘दवि्य मराठी’ने बुधवारी सर्वेक्षण केले.

हे आढळले सर्वेक्षणात
‘दवि्यमराठी’च्या चमूने सायंकाळी वाजेदरम्यान बहिणाबाई उद्यान, सागर पार्कसह इतर परिसरात पाहणी केली. या वेळी सागर पार्क हा पूर्णपणे चायनीज खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी व्यापलेला होता. त्याचप्रमाणे बहिणाबाई उद्यान परिसर, महापालिका, शविाजीनगर आणि शहरातील इतर छोट्या, मोठ्या ठिकाणीदेखील चायनीज विक्रेत्यांची संख्या मोठी होती. या ठिकाणी चायनीज पदार्थ चवीने खाणाऱ्यांचे प्रमाण उल्लेखनीय दिसून आले. सागर पार्क येथे पाच चायनीज विक्रेत्या पैकी दोन विक्रेत्यांकडे अजि-नो-मोटो आढळून आले. बहिणाबाई उद्यान परिसरातील एका विक्रेत्याकडेही अजि-नो-मोटो वापर होत होता. हक्का नूडल्स, शेजवान नूडल्स, फ्राइड राइस, चिकन चिल्ली हे चायनीज खाद्यपदार्थ अनेक नागरिकांचे विक पॉइंट असल्याचे प्रखरतेने दिसून आले.
^अजि -नो-मोटोच्या अतिवापरामुळे किडनी खराब होणे, आघात होणे, हालचाल मंदावणे आदी समस्या तीव्रतेने जाणवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी. डॉ.किरण पाटील, अतिरिक्त शल्यचिकित्सक

काय असते चायनीजमध्ये?
चायनीजखाद्यपदार्थांमध्ये रेड चिली सॉस, सोया सॉस, टोमॅटो सॉस, नूडल्स, भात, मीठ, टेस्टिंग पावडर, कांद्याची पात, कोथिंबीर, पत्ता कोबी, शमिला मिरची, व्हेनिगर, अजि -नो-मोटो हे पदार्थ वापरले जातात. खाद्यपदार्थांना आकर्षक रंग येण्यासाठी सोडियम क्लोराइड असलेला नांरगी, लाल रंग वापरण्यात येत आहे. अजि-नो-मोटो हे किराणा दुकानात १६० रुपये किलोने सहज उपलब्ध होत असल्याचे एका चायनीज विक्रेत्याने सांगितले.

किडनीचे आजार होतात
काय आहे अजि-नो-मोटो?

अजि-नो-मोटो(इसेन्स ऑफ टेस्ट ) ही शंभर वर्ष जुनी जपानी खाद्यपदार्थ कंपनी आहे.अब्जावधींची उलाढाल असलेल्या या कंपनीने आपले सीलबंद खाद्यपदार्थ अधिक चवदार व्हावेत म्हणून मोनोसोडियम ग्लुटामेट (एमएसजी)चा प्रथम वापर केला. त्यामुळे अजि-नो-मोटो म्हणजेच एमएसजी अशी ओळख झाली. सर्वसाधारणपणे टोमॅटो, चीज या पदार्थांमध्ये एमएसजी आढळते. अतिप्रमाणात अजि-नो-मोटोचे सेवन केल्यास डोकेदुखी, अस्वस्थ वाटते.विशेषत इन्स्टन्ट, सीलबंद पदार्थ उदा. नूडल्स, वेफर्स, एक मिनिटात तयार होणारे सूप यामध्ये एमएसजी आढळते.

हे आहे एफडीएच्या अहवालामध्ये
एफडीएनेशहरातील चायनीज गाड्यांची तपासणी केली असून या ठिकाणी कुठेही अजि-नो-मोटोचा वापर केला जात नाही. चायनीजबाबत जनजागृतीसाठी वृत्तपत्रातून माहिती देण्यात येते विविध ठिकाणी प्रदर्शने आयोजित केले जातात. तसेच विनापरवाना विनानोंदणी आढळून आलेल्या तीन चायनीज विक्रेत्यांकडून ७५ हजार तडजोड शुल्क दंड वसूल केला असल्याचे एफडीएने अहवालात म्हटले आहे.

सागर पार्कवर लागलेल्या चायनीज गाड्यांवर उघड्यावरच खाद्यपदार्थ तयार करण्यात येतात.
चायनीजमध्ये वापरले जाणारे अजि-नो-मोटो