भुसावळ - शहरातील इराणी वस्तीत येथील बाजारपेठ पाेलिसांच्या डीबी पथकाने गुरुवारी सकाळी ७.३० वाजता सापळा लावला. त्यात मध्य प्रदेश महाराष्ट्रात सहा पाेलिस ठाण्यांत १८ गुन्हे दाखल असलेला संशयित चिन्ना सिराजाेद्दीन इराणी (वय २७ वर्षे) याला शिताफीने अटक करण्यात अाली. मात्र, त्याला पकडण्यास विराेध करणाऱ्या महिलांनी १० मिनिटे प्रचंड झटापट करून पाेलिसांना नखांनी अाेरबाडल्याने एक हवालदार जखमी झाला अाहे.
मध्य प्रदेशातील खंडव्याच्या पाेलिसांचे पथक गुन्हे दाखल असलेला संशयित चिन्ना इराणीचा शाेध घेण्यासाठी भुसावळ बाजारपेठ पाेलिस ठाण्यात अाले हाेते. शहरातील इराणी वस्तीत ताे लपला असल्याची गुप्त माहिती मिळताच डीवायएसपी राेहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किसन नजनपाटील यांनी एक पथक नियुक्त केले. त्यात सहायक निरीक्षक मनाेज पवार, उपनिरीक्षक अाशिष शेळके, हवालदार अानंदसिंग पाटील, संदीप पालवे, सुधीर विसपुते, संजय भदाणे, वाल्मीक साेनवणे, प्रशांत चव्हाण, विकास सातदिवे, सहायक फाैजदार शैला पाचपांडे, अलका झाेपे, खंडव्याचे सहायक फाैजदार राजू पाटील, हिफाजत अली गाेहरअली, सुनील शेंगर, लतेस ताेमर, रफिक पिरमाेहंमद, महेंद्र वर्मा, राजेंद्र पांडवे यांचा समावेश हाेता. या पथकाने संयुक्तपणे गुरुवारी सकाळी ७.३० वाजता नियाेजनबद्धपणे इराणी वस्तीत काेम्बिंग अाॅपरेशन राबवले.
टाॅवरचाैकात मुसक्या अावळल्या
संशयित चिन्ना इराणी हा रजा टाॅवर चाैकात सकाळी ७.४० वाजेच्या दरम्यान चहा पिण्यासाठी येत असल्याचे संकेत पाेलिसांना मिळाले. त्यानंतर त्याचा पेहराव अाेळखून हवालदार अानंदसिंग पाटील विकास सातदिवे यांनी त्याच्यावर झडप घालून मुसक्या अावळल्या. मात्र, त्याने जाेरजाेरात अारडाअाेरड करताच इराणी वस्तीतील महिलांनी दाेन्ही पाेलिसांशी हुज्जत घालून झटापट केली. त्यात अानंदसिंग पाटील यांना नखांनी अाेरबाडल्याने ते जखमी झाले. परिसरात तैनात असलेल्या पाेलिसांनी तत्काळ धाव घेऊन या महिलांच्या ताब्यातून दाेन्ही पाेलिसांना साेडवले हुज्जत घालणाऱ्यांना चाेप दिला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर या भागात सकाळी वाजेनंतर बघ्यांची माेठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली हाेती.
वठणीवर अाणणार
पाेलिसांशी झटापट करणाऱ्यांवर कठाेर कारवाई हाेईल. गुन्हेगारीचा बिमाेड करण्यासाठी चिकित्सकपणे प्रयत्न सुरू अाहेत. इराणी वस्तीत डीबी पथकाने मुसक्या अावळलेल्या संशयिताकडून माेठ्या गुन्ह्यांची उकल हाेण्याची शक्यता अाहे. कारवाईसाठी पाेलिस पथकाने जे सूक्ष्म नियाेजन केले, ते खराेखर काैतुकास्पद अाहे. -राेहिदास पवार, डीवायएसपी,भुसावळ
पाेलिसांनी पाळली गुप्तता : गेल्यातीन दिवसांपूर्वी पाेलिसांनी वैतागवाडीत छापा टाकला हाेता. मात्र, तत्पूर्वीच माहिती फुटल्याने पथकाच्या हाती काहीच लागले नव्हते. त्यामुळे इराणी वस्तीत जाे सापळा रचण्यात अाला, त्याबाबत पाेलिसांनी कमालीची गुप्तता पाळली हाेती. त्यामुळे अट्टल संशयित गुन्हेगार पाेलिसांच्या जाळ्यात अडकला. निरीक्षक नजनपाटील यांनी या डीबी पथकाला मार्गदर्शन केले.
यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल : संशयितालापकडल्यानंतर पाेलिसांशी झटापट करून जखमी केल्याप्रकरणी हवालदार अानंदसिंग पाटील यांच्या फिर्यादीवरून तीन महिलांवर बाजारपेठ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला. त्यात अंजू परवेजअली इराणी, नुरजान अमजत इराणी, नितू माेहंमद इराणी (रा.पापानगर, जाममाेहल्ला, भुसावळ) या तिघींचा समावेश अाहे.
सात जणांचा हद्दपारीचा प्रस्ताव : इराणीवस्तीत पाेलिसांच्या कारवाईत व्यत्यय अाणणे, हल्ला करण्याचा प्रयत्न करणे, हे प्रकार नित्याचेच झाले अाहेत. या पार्श्वभूमीवर या भागातील सात जणांची टाेळी हद्दपार करण्यासाठी मुंबई पाेलिस अॅक्ट ५५ नुसार प्रस्ताव तयार करण्यात अाला अाहे. लवकरच जिल्हा पाेलिस अधीक्षकांकडून त्याचे अादेश निघतील, असे पाेलिस सूत्रांनी सांगितले.
पाेलिसांवर तिसऱ्यांदा हल्ला
इराणीवस्तीत यापूर्वी तत्कालीन निरीक्षक राजेशसिंह चंदेल, डी.डी. गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयितांना पकडण्यास गेलेल्या पाेलिस पथकावर दाेन वेळा हल्ला झाला अाहे. गुरुवारी तिसऱ्यांदा पुन्हा तसाच प्रकार घडला. त्यात पाेलिसांना महिलांनी नखांनी अाेरबाडले असले तरी संशयित गुन्हेगाराच्या मुसक्या अावळण्यात पथकाला यश अाले.