आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘फॉर यू’चा संदेश देणार्‍या अन् फ्रेममधील चॉकलेटची क्रेझ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- बालकांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकास हव्याहव्याशा वाटणार्‍या चॉक लेटचा आस्वाद रविवारी मनसोक्त घेता येणार आहे. व्हॅलेंटाइन सप्ताहाचा तिसरा दिवस असणारा ‘चॉकलेट डे’ रविवारी साजरा होणार आहे. वडील आणि मुलीच्या प्रेमाच्या नात्यालासुद्धा चॉकलेटची जोड मिळणार आहे. बाजारात यादिवसाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारचे चॉकलेट्स विक्रीस आले आहेत. त्याची आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात आली आहे. नवेनवे प्रयोग यात करण्यात आले असून प्रेमाचा संदेशही यात देण्यात आला आहे. तसेच याच संदर्भातील विविध प्रकारच्या भेटवस्तूही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. छोटे चॉकलेट, कॅडबरी, घरगुती विविध आकारांच्या चॉकलेटचा यात समावेश करण्यात आला आहे.

तरुणाईला आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांनी वेगवेगळे प्रयोग केले असून यात ‘फॉर यू’ या संदेशाची अधिकच क्रेझ दिसून येतेय. चॉकलेट फ्रेम हा नवा प्रकारही यात पाहायला मिळत आहे. फ्रेममध्ये चॉकलेट ठेवण्यात आले असून नंतर फ्रेमचा फोटोसाठी उपयोग होणार आहे. यात 26 व 48 प्रक ारच्या चॉकलेट फ्रेम उपलब्ध आहेत.

आकर्षक पॅकिंग
प्लास्टिकचे बॉक्स विविध आकारात तयार करून त्यात चॉकलेट भरण्यात आले आहेत. यात हार्ट शेप, टेडी, फ्लॉवर, फोल्डिंग बॉक्ससारखे प्रकार उपलब्ध आहेत. तसेच नेटच्या पोटलीमध्ये, नेटच्या बॉक्सला सजविण्यात आले आहे. यात मणी वर्क करून गोटा लेसद्वारे सजविण्यात आले आहे. तसेच बास्केटही यात खास आकर्षण ठरले आहे. यात रिबीन लावलेले आणि डिझाइनर असे पॅकिंग बॉक्ससुद्धा मनमोहक आहेत.

निरनिराळे आकार
चॉकलेट निरनिराळ्या आकारात विक्रीस आले असून चौकोनी आकाराच्या चॉकलेटमध्ये आयताकृती, गोलाकार यासह हार्ट शेप, चोटली आकार त्याचप्रमाणे चॉकलेटवर डिझाइन करण्यात आले आहे. तिला सजावटीचा कागददेखील रंगीबेरंगी वापरण्यात आला आहे. यात चमकीच्या भडक रंगांचा अधिक वापर केलेला आहे. त्याचप्रमाणे बदाम, काजू, क्रॅकल, ड्रायफ्रूट, व्हाइट, डार्क, प्लेन मिल्क, स्ट्रॉबेरीसारख्या फ्लेवरचा त्यास स्वाद दिलेला आहे.

प्रकार आणि किमती
हार्ट शेप 40 रु.
टेडी शेप 45 रु.
बास्केट 170 रु.
पोटली 180 रु.
डिझाइनर 100 रु.
चॉक लेट फ्रेम 300 रु
फोल्डिंग बॉक्स 250 रु

खास व्हॅलेंटाइनच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट आम्ही मागविले आहेत. या पार्श्वभूमीवर 25 किलो चॉकलेटची आयात केली जाते. त्याचप्रमाणे याला मागणीही जास्त असते. तरुणाईसह अनेकजण देखील चॉकलेट खरेदी करतात. भाविक सोनी, सोनी ड्रायफ्रूट.