आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कत्‍तलीसाठी जाणा-या जनावरांचा ट्रक जाळला, 29 मृत 11 जिवंत गुरांना काढले बाहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाेपडा- जनावरांनी खचाखच भरून जाणारा ट्रक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी साेमवारी पाठलाग करून पकडला. त्यात २९ मृत तर ११ जिवंत जनावरे अाढळली. दरम्यान, कारवाईच्या मागणीवरुन नागरिक व पाेलिसांमध्ये तब्बल ५ तास गोंधळ चालला. पाेलिसांनी पाच ते सहा वेळा लाठीचार्ज केल्यामुळे संतप्त जमावानेसुद्धा पाेलिसांवर दगडफेक केली, यात जमावाने ट्रकची ताेडफाेड करून जाळला. दरम्यान, दगडफेकीत तीन पाेलिस कर्मचारी जखमी झाले.

धरणगावकडून यावलकडे जाणाऱ्या ट्रकमधून गायी व बैलांची वाहतूक केली जात हाेती. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हा ट्रक जाताना दिसला. त्यांनी हतनूर पाटचारीपासून ते हाॅटेल याेगीपर्यंत पाठलाग करून ट्रक अडवला. या वेळी अर्ध्या तासातच शहरातील हिंदू संघटनेचे पदाधिकारी, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, बजरंग दल, हिंदू जनजागृती समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. हॉटेल योगीजवळ ट्रक अडवून कोंबलेल्या अवस्थेत दोन टप्प्यात गायी आणि बैल भरलेले होते. एकाच ट्रकमध्ये तब्बल ४० जनावरे भरल्याने काही मृत झाली होती. पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यानुसार ट्रकमध्ये २९ मृत तर ११ जिवंत जनावरे आढळून आली. या वेळी संतप्त जमावाने ट्रकचालक, सहचालकास जबर मारहाण केली. ट्रकमध्ये भरलेली जनावरे यांची दुर्गंधी येत असल्याने पोलिसांनी सर्व जनावरे कार्यकर्त्यांच्या मदतीने उतरवून घेतली.

जमावाची दगडफेक
ट्रकची तपासणी केली असता केबिनमध्ये विविध राज्यांचे नंबर प्लेट व अन्य धार्मिक स्थळांचे फोटो आढळल्याने जमावाने गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र पाेलिसांनी बळाचा वापर करुन जमाव पांगवण्याचा प्रयत्न केल्याने जमाव अधिकच संतप्त झाला व पाेलिसांवर दगडफेक सुरु झाली. त्यात सहायक पाेलिस निरीक्षक आर .एन. पवार , अडावदचे पोलिस उपनिरीक्षक पंकज शिंदे, चोपडा शहरचे सहायक फौजदार वसंत चव्हाण, किरण पाटील हे जखमी झाले. पुन्हा जमाव गाडीजवळ आला. पोलिसांशी हुज्जत सुरू असताना जमावाने गाडी पेटवून दिली. या तासाभरात तब्बल पाच वेळा संतप्त जमावाकडून दगडफेक करण्यात आली. दरम्यान, शहरात शांतता निर्माण करण्यासाठी पाेलिसांसह सर्वपक्षीय नेते, संघटनांचे पदाधिकारी यांच्याकडून प्रयत्न केले जात अाहेत.

अपर अधीक्षकांची बोलतीच बंद
जनावरांची वाहतूक करणारा ट्रक सकाळी ११ वाजता धरणगाव-चोपडा रस्त्यावरून शहरात आला. या रस्त्यावर धरणगाव नाक्यावर दररोज वाहतूक पोलिस गस्त घालीत असताना, हा ट्रक पास झालाच कसा? असा प्रश्न अपर पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना पत्रकारांनी विचारला. मात्र, याबाबत चौकशी करतो, असे त्यांनी सांगितले. मात्र, काही वेळापर्यंत त्यांना उत्तर देता आले नाही.

पाेलिसास घेरले
चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी किरण पाटील यांना तर संतप्त जमावाने चारही बाजूंनी घेरून जबर मारहाण केली. मात्र, त्यांना सोडवण्यासाठी एकही पोलिस अधिकारी, कर्मचारी धावून गेला नाही.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, घटनास्‍थळावरील फोटो..