आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोपडा दंगलप्रकरणी २० आरोपींना कोठडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा - शहरातील नवग्रह मंदिराचे दिशादर्शक फलक लावण्यावरून तरुणांना झालेली मारहाण शुक्रवारी पोलिस अधीक्षक यांनी घेतलेल्या बैठकीवर झालेल्या दगडफेकप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित २० आरोपींना शनविारी १४ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती शनविारी चोपडा पोलिसांनी दिली.

मारहाण दगडफेक करणा-या संशयित आरोपींविरुद्ध शहर पोलिसांत सहायक पोलिस निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्या फिर्यादीवरून दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्या सर्वांना शनविारी चोपडा न्यायालयात हजर करण्यात आले होते. गेल्या गुरुवारी शेतपुरा येथे नवग्रह मंदिराचे कार्यकर्ते दिशादर्शक फलक लावत असताना ईश्वर अलकरी, जयेश बडगुजर, सुनील सोनगिरे (रा.शेतपुरा) यांना टिकाव, दांडा, कुदळने डोक्यावर वार करून जखमी केले होते. त्यावरून शहर पोलिसांत आरोपी मका शेख कयामत अली, शे.वाजदि शे.शफी, शे.शेरू शे.कालू, शे.असफाक शे.भु-या (रा.शेतपुरा) यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली होती.

तसेच शुक्रवार दि.१० रोजी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी घेतलेल्या बैठकीवर दगडफेक झाली होती. यात इब्राहिम सय्यद अली, मजदि बेग ऊर्फ मक्या, सहाबखान शब्बीरखान, नाजिमबेग मुसाबेग, असलम शेख जहागीर बेग, शेख अन्सार शे. नूर, काल्या ऊर्फ करीम रसूल अरब, असरफ अली अब्बासअली, अब्दुल मुख्तार अब्दुल नौनोद्दीन, असलम शेख रफीक मोमीन, भटू पाटील, दिनेश चौधरी, प्रदीप ठाकूर, किशोर बागुल, सुरेश मराठे, प्रवीण कोळी (सर्व रा.चोपडा) यांना संशयित आरोपी म्हणून पकडण्यात आले आहे. या सर्वांना शनविारी चोपडा न्यायालयात उभे केले असता १४ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

शांततेसाठी पोलिसांचे शहरात पथसंचलन
शहरातशांतता प्रस्थापित व्हावी म्हणून शनविारी सायंकाळी वाजता सर्व पोलिस कर्मचारी आर.सी.पी.चे दोन प्लाटून यांनी गुजराथी गल्ली, आशा टॉकीज, मेन रोड, आझाद चौक, शविाजी चौक ते ग्रामीण पोलिस ठाण्यापर्यंत पथसंचलन केले. सध्या नाशिक ग्रामीण पोलिस ठाण्याचे ४३ पोलिस कर्मचारी, तीन अधिकारी तसेच नरडाणा, धुळे, थाळनेर, शिंदखेडा, चोपडा ग्रामीण शहर, अडावद, जळगाव मुख्यालयाचा पोलिस बंदोबस्त तैनात आहे.

आमदारसोनवणे यांचे शांततेचे आवाहन
चोपडाशहरात घडलेल्या अनिष्ठ प्रकाराबाबत आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे सांगत जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, पालिका प्रशासन रविवारपासून सात कर्मचा-यांचे पथक तयार करुन मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढणार आहे. शहरात मुख्य रस्त्यावर दिशा दर्शक पांढरे पट्टे, नो पार्किंग झोन, तयार करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी सांगितले.
चोपडा शहरात शनिवारी सायंकाळी पथसंचलन करताना पोलिस कर्मचारी.