आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Choreography Is Best Career Says Dancer Shama Bhate

तरुणींनो, नृत्यात करा करिअर - नृत्यांगना क्षमा भाटे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - आज प्रत्येक तरुणीला आयटी, श्क्षिण, फिल्मसह इतर विविध क्षेत्रात करिअर करण्याची आवड आहे; परंतु नृत्यात फार कमी जण येतात. त्यामुळे तरुणीनी नृत्य क्षेत्राची देखील करिअर म्हणून निवड करावी. त्यासाठी शिक्षण देखील उपलब्ध आहे. त्यादृष्टीने तरुणीनी विचार करावा असे मत प्रसिद्ध नृत्यांगना गुरुपंडिता क्षमा भाटे यांनी ‘दिव्य मराठी’जवळ व्यक्त केले.

क्षमा भाटे म्हणाल्या शहरारत वर्षभर अनेक कार्यक्रम होतात. या कार्यक्रमांसाठी एकसारखे ड्रेस लागतात. जर एखाद्या मुलीने ड्रेस डिझायनिंगचा कोर्स केला असेल तर ते तिचा चांगलेच फायद्याचे ठरेल. तसेच डाएटीशियनचा एक वर्षाचा कोर्स केल्यास नृत्य शिकणार्‍यांनी कसे डाएट घ्यावे याबाबत मार्गदर्शन करता येईल. जळगावचे वातावरण नृत्यकलेसाठी पोषक आहे. येथील नृत्य प्रशिक्षक वा गुरू फक्त शिकवणे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर न ठेवता करिअर म्हणून मुलींना प्रोत्साहित करत आहेत.

नृत्याकडे लोकांचा कल वाढला

0 नृत्याचे सादरीकरण चांगले हवे असे नाही, तर त्यासोबत मंचदेखील उत्तम असावा. तसेच अनुरूप प्रकाशव्यवस्था, वेशभूषा यांनादेखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. रिअँलिटी शोमध्ये तीन-तीनमजली स्टेज बांधण्यामागचे कारण हेच आहे.

0 कथ्थकमधील अनेक बारकावे एकल नृत्यप्रकारात केल्यास ते हॉलमध्ये बसलेल्या अखेरच्या माणसाला दिसत नाहीत. हेच बारकावे दिसण्यासाठी एकच हावभाव एकाच वेळी 15 जणींनी केल्यास ते प्रत्येकाला दिसते. त्यामुळे ग्रुपने कथ्थक नृत्य करण्यामागे ही संकल्पना आहे.

0 सध्या समाजाला भारतीयत्व असलेल्या विविध कलांची आवड निर्माण झाली आहे. त्यासाठी पालकही मुलींना प्रोत्साहन देत आहेत. जळगाव शहरातून दोन विद्यार्थिनी माझ्याकडे एमएला शिकायला येत आहे. यावरुद असे दिसते की लोकांचा नृत्यकलेकडे कल वाढला दिसतो. तो अधिक वाढविण्यासाठी मुलींच्या पालकांनीदेखील यास पाठिंबा देणे आवश्यक आहे.