आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएमआर मैदानावर टोळक्याची विद्यार्थ्यास सिनेस्टाइल मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आयएमआर महाविद्यालया जवळ असलेल्या मैदानावर शनिवारी सायंकाळी टारगट तरुणांच्या टोळक्याने एका दहावीतील विद्यार्थ्यास बेदम मारहाण केली. सुमारे २० ते २५ टवाळखोरांनी या तरुणास अगदी सिनेस्टाइल हवेत उचलून-उचलून मारले. या वेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांना त्याची खबर लागली. पोलिस आल्याचे पाहताच या टारगटांनी आपल्या माेटारसायकली तिथेच सोडून अंधारात धूम ठोकली. या ठिकाणाहून पाच मोटारसायकल, तीन सायकली पोलिसांनी जप्त केल्या असून, तीन तरुणांनाही ताब्यात घेतले आहे. शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेसची रांग असलेल्या आयएमआर महाविद्यालयाच्या रस्त्यावर टारगट मुलांच्या धिंगाण्यामुळे परिसरातील नागरिकही वैतागले असून वादविवाद, भांडणे, मारहाणीच्या घटना नेहमीच घडत असल्याचे समोर आले आहे. गेल्या चार दिवसांतील हाणामारीची ही तिसरी घटना आहे.
आयएमआर कॉलेजजवळ असलेल्या मैदानावर सायंकाळी वाजेच्या सुमारास २०-२५ तरुणांचे एक टोळके ला.ना.शाळेतील एका दहावीच्या विद्यार्थ्यास बेदम मारहाण करीत होते. या किशोरवयीन तरुणास एखाद्या हिंदी चित्रपटात शोभेल, अशी मारहाण केली जात होती. त्याला हवेत उचलून-उचलून हे टोळके मारहाण करीत होते, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. मारहाण सुरू असतानाच गस्तीवर असलेल्या पोलिसांना त्याची खबर मिळाली. पोलिस अधीक्षकांच्या या पथकाने तत्काळ आयएमआर मैदानाच्या दिशेने धाव घेतली. परंतु, पोलिस येत असल्याचे पाहून या टारगटांनी आपली वाहने तेथेच सोडून पळ काढला. हिवाळ्यामुळे लवकर अंधार होत असल्याने या तरुणांनी अंधाराचा फायदा घेऊन धूम ठोकली. मात्र, घटनास्थळावरून जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या पथकाने पाच मोटारसायकल, तीन सायकली जप्त केल्या आहेत.

माहिती देण्यास टाळाटाळ
पोलिसपोहोचल्यानंतर त्यांनी परिसरात चौकशी केली. परंतु, कुणीही माहिती देण्यास पुढे येत नव्हता. अखेर पोलिसांनी त्या ठिकाणी असलेल्या तीन तरुणांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली. परंतु, त्यांनीही काहीच माहिती नसल्याचे सांगून कानावर हात ठेवले. मात्र, दहावीतील विद्यार्थ्यास एवढी मारहाण करण्यामागे काय कारण? हे कळू शकले नाही. मारहाण झालेला किशोरवयीन मुलगा ला.ना.शाळेचा विद्यार्थी असून प्रेमनगर भागातील रहिवासी आहे.

कायम गस्त असावी
या परिसरात टवाळखाेरांचा माेठ्या प्रमाणावर त्रास वाढला अाहे. अंधार पडल्यानंतर या मैदानावर अनेक अवैध कामे हाेतात. त्यामुळे पाेलिसांनी या परिसरात कायम गस्त घातली, तर हा त्रास कमी हाेईल. सचिन राजपूत, रहिवासी

महिलांना त्रास
अायएमअार काॅलेजजवळ असलेल्या मैदानावर टवाळखाेर मुले नेहमीच बसलेले असतात. अंधारात तर या रस्त्यावरून जाणेही महिलांना कठीण झाले अाहे. त्यामुळे कारवाईची गरज अाहे. कविता शिंदे, रहिवासी

टारगटांचा मोर्चा आता आयएमआरकडे
सागरपार्क मैदानावर यापूर्वी टारगटांचा अड्डा होता. या ठिकाणी खाद्यपदार्थांच्या गाड्यांजवळ नेहमीच वादविवाद, हाणामाऱ्या होत होत्या. त्यामुळे या खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या गाड्यांना प्रशासनाने तेथून हुसकावून लावले. आता टारगटांनी आपला मोर्चा आयएमआर कॉलेजजवळ असलेल्या मैदानावर वळवला आहे. अंधार पडल्यानंतर सायंकाळी ते रात्री वाजेदरम्यान टवाळखाेर महिला, तरुणींची छेड काढतात.

चार दिवसांत तीन हाणामाऱ्या
अायएमअारमहाविद्यालय ते ख्वाजामियाँ दर्ग्यापर्यंतच्या रस्त्यावर गेल्या चार दिवसांत तीन हाणामाऱ्यांच्या घटना घडल्या आहेत. १३ जानेवारीला ख्वाजामियाँ दर्ग्याजवळ तरुणांच्या दाेन गटांत तुफान हाणामारी झाली हाेती. या प्रकरणी जिल्हापेठ पाेलिसांनी एका विनाक्रमांकाची बजाज पल्सर माेटारसायकल जप्त केली. त्यानंतर १४ जानेवारीला त्याच रस्त्यावर काही तरुणांनी दाेघांना बेसबाॅलच्या बॅटने बेदम मारहाण करून पसार झाले हाेते, तर १६ जानेवारी रोजी अायएमअार काॅलेजजवळ मैदानावर एका दहावीच्या विद्यार्थ्याला मारहाण करण्यात अाली आहे.