आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेर तालुक्यात पाण्यासाठी नागरिकांची वाढतेय भटकंती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर - वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची चिंता वाढली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये 38 गावांना पाणीटंचाईची झळ पोहचली असून त्या गावांमध्ये 40 विहिरी अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत. एकूण 48 गावांमध्ये पाण्यासाठी वणवण सुरू आहे. त्यात 10 गावांना पाच टँकर सुरूआहेत. ग्रामीण भागातील पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे पाणी रे पाणी..अशी अवस्था आहे.

तालुक्यातील विहिरींनी तळ गाठला असून अहोरात्र चालणार्‍या विहिरी टप्प्यावर आल्या आहेत. ज्या विहिरींनी तळ गाठला आहे, त्या तर चक्क बंद पडल्या आहेत. त्यामुळे शेती तर थंडावली मात्र पिण्याचे पाणीही मिळेनासे झाले. अनेक गावांना आठ ते 10 दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी वीज भारनियमनाचाही फटका पाणीपुरवठय़ास बसला आहे. काही गावांना विहीर अधिग्रहणाचे पाणी पुरेसे मिळत नसल्याने त्यांना शेतातून बैलगाडीवर पाणी आणावे लागते. सायकलला ड्रम टांगून, डोक्यावर हंडे नेत पाणी वाहताना नागरिक दिसत आहेत. हे लाखोंच्या पाणी योजना राबविणार्‍या लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. मात्र प्रशासन अद्याप त्यांची चौकशीच करीत आहे. आतापर्यंत कारवाई झाली नाही. याउलट अनेक योजनांचे अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा अधिक रकमा मंजूर होऊन बिलांचे धनादेश मंजूर होत आहेत.
वर्षभर पाणीटंचाई

देवगाव - देवळी, ढेकू खुर्द,दहिवद खुर्द, दहिवद, टाकरखेडा, धार, कंडारी खुर्द, लोणे.

जानेवारीपासून टंचाई
चौबारी, खेडी बु, पळासदळे,हेडावे, धुपी, सोनखेडी, मांजर्डी, ढेकू बु, ढेकूसिम, एकतास, मुडी प्र.डांगरी, बहादरवाडी, सारबेटे खुर्द, कुर्‍हे बु., मांडळ, जवखेडा, सबगव्हाण, धानोरा, अमळनेर (दोन विहिरी), शिरसाळे बु., भरवस, भोरटेक, एकलहरे, म्हसले, नंदगाव, अमळनेर, मुडी-दरेगाव, खर्दे, नीम
येथे आहे टँकर सुरू
डांगर बु, लोणपंचम, कचरे, तळवाडे, लोणचारम तांडा, पिंपळे बु., अटाळे, इंद्रापिंप्री , सुंदरपट्टी, खवशी.
तलाव देखील कोरडे

बोदर्डेसारखी गावे केवळ विहिरीत गळ साचल्याने भीषण टंचाईला सामोरे जात आहे. त्याठिकाणी केवळ पाच ते सात मिनिटांचा पाणीपुरवठा जेमतेम होत आहे. धार सारख्या गावांत केवळ दोनच नळ सुरू आहेत. दिवसभर रांग लावत पाण्यासाठी वणवण आहे. या गावाला दोन बोअर केले. मात्र त्यापैकी पाझर तलावाजवळचा एक कोरडा गेला तर दुसरा पीर बाबा दग्र्याजवळचा तीन तास चालतो . त्याचाच आधार आहे. त्यावर गेल्या महिन्याभरात दोन नळ चालतात. पर्यायी व्यवस्थेची मागणी होत आहे.
पंचायत समितीकडून ज्या ज्या गावांचे विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव येत आहेत त्यांना तातडीने चौकशी करून मंजुरी दिली जात आहे. टँकर मागविण्याच्या प्रस्तावाची चौकशी केली जात असून त्यानंतर टँकर मंजूर करण्यात येतात. प्रमोद हिले, तहसीलदार, अमळनेर