आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेनसाखळी चाेराला नागरिकांनी चाेपले, चाेरटा अमरावतीचा माेबाइल विक्रेता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: भारत वासवानी
जळगाव - दादावाडीतील दत्त मंदिरासमाेर रविवारी रात्री वाजता साेनसाखळी अाेढून पळणाऱ्या चाेरट्याला परिसरातील तरुणांच्या मदतीने तालुका पाेलिसांनी ताब्यात घेतले अाहे. या चाेरट्याला नागरिकांनी चांगलाच चाेप दिला. त्याच्यावर विदर्भात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल अाहेत. दत्त मंदिरात रविवारी रात्री वाजता अारती सुरू हाेती. मंदिरात सुवर्णा प्रकाश नेमाडे या येत हाेत्या. मंदिराच्या जवळच नेमाडे यांच्यासमाेरून माेटारसायकलवर एक तरुण अाला. त्याने त्यांच्या गळ्यातील साेनसाखळी अाेढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रसंगावधान राखत साेनसाखळी पकडून ठेवत अारडाअाेरड केली. काही अंतरावर तरुण बसलेले हाेते. त्यांना चाेरटा असल्याचे लक्षात अाल्याबराेबर त्यांनी चाेरट्याची माेटारसायकल अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पळून जाण्यासाठी माेटारसायकल वळवली.
पण ती घसरल्याने ताे पडला. हा प्रकार सुरू असताना गस्तीवरील तालुका पाेलिस ठाण्याचे जितेंद्र पाटील, गिरीश पाटील, मनाेज पवार अाणि नंदकिशाेर धनके यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चाेरट्याला ताब्यात घेतले. जमावाने चाेरट्याची धुलाई केली. चाेरट्याला ताब्यात घेतल्यानंतर तालुका पाेलिसांनी त्याची चाैकशी करून त्याची तपासणी घेतली. त्याच्याजवळ अाधार कार्ड सापडले असून त्याच्यावर त्याचे नाव भारत गुरुदास वासवानी (वय ३०, रा.सिंधूनगर, सदानी दरबारजवळ, छत्री तलाव राेड, अमरावती) असे अाहे. तसेच ताे अमरावती येथे माेबाइल विक्री अाणि दुरुस्तीचे काम करीत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली अाहे. भारत वासवानीवर नागपूर, वर्धा, अमरावती, अकाेला या ठिकाणी गुन्हे दाखल अाहेत.