आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: रेन वाॅटर हार्वेस्टिंगसाठी नागरिकच जागरूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सध्या वाघूर धरणात पुरेसा साठा असल्यामुळे जळगावकरांना पाणीटंचाईची झळ पाेहाेचलेली नाही. परंतु येत्या दाेन वर्षात पुरेसा पाऊस झाल्यास लातूर सारखी अवस्था हाेण्याची भीती अाहे. त्यामुळे जमिनीची जलपातळी उंचावण्यासाठी पालिकेकडून हाेणाऱ्या अावाहनाला शहरातील जागरूक नागरिकांकडून प्रतिसाद मिळू लागला अाहे. रेन वाॅटर हार्वेस्टिंग करण्यासाठी पालिकेचे अधिकारी जागेची पाहणी करून मार्गदर्शन करू लागले अाहेत.

राज्यभरात दुष्काळाने जनता हैराण झाली अाहे. जळगाव जिल्ह्यातही ग्रामीण भागात अाठवडा १५ दिवसांतून पाणीपुरवठा हाेत अाहे. पिण्याच्या पाण्यासाठी अातापासून वणवण भटकावे लागत अाहे. विहिरींची जलपातळी घटली असून बाेअरिंग बंद पडण्याच्या अवस्थेत अाहेत. अशा परिस्थितीत दाेन दिवसांनी वेळेवर पाणी मिळत असल्याने जळगावकरांमध्ये समाधानाचे वातावरण असले तरी लातूरसारखी परिस्थ‌िती जळगावकरांवर उद‌्भवू नये, यादृष्टीने पालिका प्रशासनाने पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी जनजागृती सुरू केली अाहे. या अावाहनाला जळगावकरांनीही चांगला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली अाहे. पालिकेकडून नवीन बांधकामांना जुन्या तसेच माेठ्या बांधकामांना नाेटीस देण्यास सुरुवात केली अाहे.

असे जमिनीत जिरवा पाणी....
छतावरून पावसाळ्यात पडत असलेले पाणी पाइपाने एकत्रित अाणून एका विशिष्ट प्रकारच्या फिल्टरमधून गाळून विंधन विहिरींमध्ये साेडून देण्यात येते किंवा जमिनीमध्ये मुरवता येते. मीटर बाय मीटरचा जमिनीमध्ये खड्डा करून फिल्टर मटेरिअलचे भरावा. त्यात इंचापर्यंत वाळू, दगड, गाेटे भरावे. तळालगतच्या भागात १२ ते २० मिमी व्यासाचे दगड, गाेटे टाकावेत. दुसऱ्या थरात ते १२ मिमी व्यासाचे दगड, गाेटे टाकावेत. सर्वात वरचा थर ते मिमी व्यासाच्या दगड-गाेट्यांनी भरावा. पावसाळ्यात घराच्या छतावरील पावसाचे पाणी एकत्रित करून खड्ड्यांमध्ये साेडावे. अशा पद्धतीनेही पाणी जिरवणे शक्य अाहे.

नागरिकांचा प्रतिसाद वाढत अाहे
रेन वाॅटरहार्वेस्टिंग ही काळाची गरज झाली अाहे. भविष्यातील धाेका लक्षात घेऊन अाजच सावध हाेणे गरजेचे अाहे. त्यासाठी वाहुन जाणाऱ्या पाण्याचा एकेक थेंब जमिनीत जिरवणे गरजेचे अाहे. विसनजीनगरातील एका इमारत मालकाच्या जागेची पाहणी करून रेन वाॅटर हार्वेस्टिंग कशा पद्धतीने करता येईल याचे मार्गदर्शन केले. यासंदर्भात नागरिकांचा प्रतिसाद वाढत अाहे. विलास साेनवणे, प्रभाग अधिकारी