आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान, शहरात नागरिकांना लुबाडणारी साधूंची टाेळी सक्रिय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पांढरी वस्त्र परिधान केलेले, कपाळावर चंदनाचा टिळा लावलेले १० ते १२ साधू गेल्या महिनाभरापासून शहरातील नवीपेठ, बळीरामपेठ, विसनजीनगर या भागात फिरताहेत. एखाद्या बंद घराच्या अाेट्यावर बसून ते रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना इशारा करून बाेलावतात. त्यानंतर चहासाठी पैसे मागतात. एखाद्याने पैसे दिले तर त्याच्याकडून देवाला गावराणी तूप चढवण्यासाठी ४०० ते ५०० रुपयांची मागणी करतात. पैसे देण्यास नकार दिला, तर थेट बळजबरी करत अशा तक्रारी वाढल्या आहेत. पाेलिसांनी या साधूंच्या ‘काळ्या धंद्याला’ लगाम लावण्याची मागणी हाेत अाहे. या विषयी ‘दिव्य मराठी’च्या चमूने गुरुवारी शहरात स्वत: पाहणी केली.
साधूंची चाैकशी करणार
^भाेंदूबाबांनी फसवल्याची एकही तक्रार अामच्याकडे अालेली नाही. मात्र, शहरात अशा पद्धतीने नागरिकांना फसवले जात असेल तर त्यांची चाैकशी करून याेग्य ती कारवाई करण्यात येईल. यासाठी गुुन्हे शाेध पथकाचे कर्मचारी पाठवून चाैकशी केली जाईल. प्रदीपठाकूर, पाेलिस निरीक्षक, शहर पाेलिस ठाणे

नागरिकांनी सावध रहावे
^नागरिकांना बाेलण्यातगुंतवून पैसे गंडवण्याचे काम हे भाेंदूबाबा करतात. त्यामुळे काेणीही या भाेंदूबाबांच्या अामिषाला किंवा त्यांनी दाखवलेल्या भीतीला घाबरून पैसे देऊ नये. त्यांची तक्रार पाेलिसात करावी. डाॅ.प्रदीपजाेशी, राज्य कार्यवाह, अंनिस

नटवरमल्टिप्लेक्सकडून एक २० ते २२ वर्षांचा पांढरी वस्त्रे परिधान केलेला साधू जयप्रकाश नारायण चाैकातून मद्रास बेकरीकडे अाला. त्याला शरद अकाेले (वय २४, रा. मुक्ताईनगर) याने कुठून अाला अाहात, असे विचारले. त्या वेळी त्याने अयाेध्या येथून अाल्याचे सांगून चहा पिण्यासाठी १० रुपये मागितले. त्यानंतर ताे साधू अकाेले यांना घेऊन बंद दुकानाच्या अाेट्यावर बसला. त्याने अकाेले यांना नाशिकला जात असल्याचे सांगून अभिषेकासाठी किलाे तुपाची मागणी केली. मात्र, त्यावर अकाेले यांनी पैसे नसल्याचे सांगितले. त्या वेळी साधूने जेवढे पैसे असतील तेवढे देण्याची मागणी केली. पण अकाेले यांनी त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला. तरीदेखील त्या साधूने अकाेले याचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला.

स्थळ : व.वा.वाचनालयवेळ: दुपारीवाजता.
व.वा.वाचनालयाच्या गल्लीतील चाळीच्या पायऱ्यांवर ३० ते ३५ वयाेगटातील पांढरी वस्त्रे परिधान केलेला साधू बसलेला हाेता. त्याने पंकज संताेष शेटे (वय २२, रा. अमळनेर) याला बाेलावले. त्याने १० रुपये दिल्यानंतर साधूने पंकजला बसवून घेतले. त्याला विचारले, तुम्ही मांसाहार करता का? करत असाल तर ते साेमवार, मंगळवार अाणि शनिवारी करू नका असे सांगितले. त्यानंतर तुम्ही घरात चिडचिड करतात, तुमच्या अायुष्यात गेल्या तीन वर्षांपासून अनेक अडचणी सुरू अाहेत. त्यासाठी साधूने त्याच्या झाेळीतून एक रुद्राक्ष काढून पंकजला दिला. त्यानंतर त्यानेही तुपाची मागणी केली. त्यावर पैसे नसल्याचे सांगितल्यावर ‘तुझ्या खिशात पैसे अाहेत. मात्र, तू देत नाही, त्यामुळे तुझ्या अडचणी दूर हाेणार नाहीत’ असे सांगितल्यानंतर पंकजने मित्राची अाई अाजारी अाहे. तिला देण्यासाठी पैसे अाणल्याचे सांगितले. साधूने पैसे बघण्यासाठी मागितले. मात्र, पंकजने त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला.

स्थळ : युनियन बँक वेळ : सकाळी ११ वाजता
बँकस्ट्रीट परिसरातील युनियन बँकेच्या अाेट्यावर एक ४० ते ४५ वयाेगटातील पांढरी वस्त्रे परिधान केलेला साधू बसलेला हाेता. ताे रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांना इशाऱ्याने बाेलवत हाेता. निशिकांत काळे (वय २७, रा. प्रेमनगर) हा तरुण त्या साधूजवळ गेल्यानंतर साधूने त्याच्याकडे चहा पिण्यासाठी पैसे मागितले. त्यानंतर थाेड्याच वेळात तुपाची मागणी केली. पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर साधूने निशिकांतचा हात धरून जबरदस्तीने खिशाला हात लावून तुझ्याकडे पैसे अाहेत; ते दिले नाही तर तुझे वाईट हाेईल, असे सांगितले. त्या वेळी निशिकांतने साधूचा हात झटकून तो त्या ठिकाणाहून निघून गेला.

स्थळ : बँक स्ट्रीट वेळ : दुपारी १.३० वाजता.
बँकस्ट्रीटवरील दीप फार्मसी या मेडिकलच्या मागच्या बाजूला असलेल्या अाेट्यावर एक ५० ते ५५ वयाेगटातील साधू बसला हाेता. ताे रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या महिला, पुरुषांनाही बाेलवत हाेता. त्याने दिनकर बाविस्कर (वय ४२, रा. पुनगाव) यांना बाेलावले. त्यांच्याकडून चहासाठी १० रुपये मागितले. त्यानंतर त्यांना पायरीवर बसवून हात बघून तुमच्या अायुष्यात माेठी अडचण येणार असल्याचे सांगितले. अाम्ही शिर्डीला जाणार अाहाेत. साईबाबांना तूप चढवले, की तुमचे संकट दूर हाेईल, असे सांगितले. त्यासाठी बाविस्कर यांच्याकडून तूप किंवा ५०० रुपयांची मागणी केली. त्यानंतर बाविस्कर साधूला चहा पिण्यासाठी घेऊन गेले. त्यांनी पैसे अाणून देताे म्हणून सांगून त्या ठिकाणाहून निघून गेले. तसेच साधूला त्याचे फाेटाे काढत असल्याचे लक्षात असल्यावर साधूनेदेखील घटनास्थळावरून धूम ठाेकली.
बातम्या आणखी आहेत...