आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमावाची सैरावैरा पळापळ; दाेन तास तणाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरातील संवेदनशील पण वर्दळीच्या रस्त्यांवर मंगळवारी सैरावैरा पळणारा जमाव तसेच त्यामागे काठ्या घेऊन धावणारे पाेलिस हे दृश्य पाहून नागरिकांचीही घाबरगुंडी उडाली. पाेलिसांपासून बचाव करणाऱ्या जमावातील अनेकांनी चक्क पांझरा नदीच्या वाहत्या पाण्यातून रस्ता काढला. मात्र, पाेलिसांनी तिथेही त्यांचा माग काढून पकडले बेदम चाेप दिला. त्यामुळे तीन महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली हाेती. या मार्गांवर संचारबंदी लागल्यासारखी स्थिती झाली. बहुतांश वाहतूक गणपती पुलावरून वळविली गेल्यामुळे तिथे जणू चक्का जाम झाला. तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात दाेन तास तणावाची स्थिती हाेती.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात हाेणारी अांदाेलने निदर्शने तसेच घाेषणाबाजी तशी नवी नाही. त्याची सवय या परिसरातील शाळांच्या विद्यार्थ्यांसह शासकीय कर्मचाऱ्यांनाही झाली अाहे. मात्र ही अांदाेलने हाताळताना निष्काळजी झाली की काय हाेते ते मंगळवारी दिसून अाले. मुळात काेणतेही अांदाेलन असले की, पुरेसा बंदाेबस्त असणे गरजेचे झाले अाहे. मात्र, मंगळवारी अाठ ते दहा गावातील शेतकरी अांदाेलन करीत असताना पाेलिसांचा पुरेसा बंदाेबस्त नव्हता. त्याचबराेबर जिल्हाधिकाऱ्यांनी नीटपणे स्थिती हाताळली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी इमारतीवरच दगडफेक झाली. त्यानंतर पाेलिसांनी लाठीमार केला. तेव्हा अांदाेलकांचा जमाव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पळून रस्त्यावर सैरावैरा धावताना दिसत हाेता. अांदाेलक शेतकरी रस्ता दिसेल तसे पळ काढत, जीव वाचवत सैरावैरा धावत हाेते. तर पाेलिस त्यांचा पाठलाग करीत एकेकाला पकडून चोप देत हाेते. आकांताने धावत सुटलेल्या शेतकऱ्यांपैकी काहींनी सरळ पांझरा नदीच्या वाहत्या पात्रात उड्या घेतल्या. पोलिसांनीही वाहत्या पात्रात उतरून शेतकऱ्यांना चोप दिला. तर काही शेतकऱ्यांनी गणपती मंदिराकडे, संतोषी माता मंदिराकडे तर काहींनी झाशी राणी पुतळ्याकडे पळ काढला. या सर्वांचा पाठलाग करीत पाेलिस धावत हाेते. त्यामुळे नागरिकही घाबरले. त्यांनीही पटापट वाहने वळवून रस्ते बदलले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चारही बाजूने असलेल्या रस्त्यांवर वाहतुकीची काेंडी झाली. लाठीचार्जनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभोवताली दाेन तास तणावाची स्थिती हाेती. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात किंकाळ्या फोडणाऱ्या महिलांचा अावाज एेकून शाळेतील विद्यार्थ्यांमध्येही घबराट पसरली हाेती. दुपारी १:३० वाजेच्या सुमारास घडलेल्या घटनेनंतर सायंकाळपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

काचांसह दगड, विटांचा खच
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील दालनापर्यंत काचांचा खच दिसून अाला. तर इमारतीच्या अावाराबाहेर दगड, विटांचा खच दिसला. कार्यालयाच्या अावारातीलच दगडे उचलून अांदाेलकांनी भिरकावली.

दगडफेकीत पुरवठा विभागातील अव्वल कारकून कल्पना विजय पवार (४७) अाणि नियाेजन कार्यालयातील मानव विकास अधिकारी रामदास अानंदा पवार हे जखमी झाले. तसेच शहर पाेलिस ठाण्याचे कर्मचारी राहुल धर्मराज पाटील, चेतन साहेबराव साेनवणे, प्रकाश शंकर थाेरात, मिलिंद उत्तमराव साेनवणे, किरण महारू बागुल, श्याम रमेश चंद्रात्रे, जितेंद्र शंभू अाखाडे, मुक्तार सुपडू मन्सुरी, नारायण माधवराव करमकर, रफिक रशीद पठाण, दिनेश प्रकाशचंद परदेशी, याेगेश नारायण साेनार, विनायक सीताराम साेनवणे, हारून महंमद सल्लाउद्दीन, खंडलाय येथील दिनेश हांडू पाटील, पाेलिस मुख्यालयाचे अानंदा पाटील, नंदुरबार जिल्हा कारागृहाचे रवींद्र पारशा वळवी अाणि समृद्धी सुरेश पाटील (४) रा. चहुत्रे, ता. पाराेळा या लहान मुलीलाही दुखापत झाली.
प्रशासनावरच हल्लाबोल
पाेलिसांपासून बचावासाठी अांदाेलक लपले नदीच्या वाहत्या पाण्यात
नदीपात्रातही एकेकाला पकडून चाेप; वर्दळीच्या मार्गावर संचारबंदीची स्थिती
जिल्हाधिकारी कार्यालयाला सायंकाळपर्यंत होता पाेलिस पथकाचा वेढा
सात वर्षांपूर्वी झालेल्या कोळी समाज आंदोलनाच्या गाेळीबाराची अाठवण ताजी
दीडशे जणांविरुद्ध गुन्हा; ८० ताब्यात
जिल्हाधिकारीकार्यालयावर दगडफेक करणाऱ्या जमावातील सुमारे दीड अांदाेलनकर्त्यांविरुद्ध शहर पाेलिस ठाण्यात दगडफेक, दुखापत करणे अाणि शासकीय कामात अडथळा अाणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. त्यापैकी ८० जणांना ताब्यात घेण्यात अाले अाहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाचे सचिव तथा तहसीलदार दत्ता शेजूळ यांनी पाेलिस ठाण्यात दगडफेक करणाऱ्या जमावाविरुद्ध तक्रार दिली अाहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले अाहे की, पाेलिसांची परवानगी घेता अांदाेलन करणाऱ्या अांदाेलनकर्त्यांची प्रशासनाकडून चर्चा करण्यात अाली. तसेच याबाबत समन्वयाची भूमिका घेतली जात असताना जमावातील काही जणांनी थेट अावारात प्रवेश करीत जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतल्याने गाेंधळ उडाला. या गाेंधळात काहींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केली. त्यात दाेन कर्मचाऱ्यांसह २४ जण जखमी झाले असून, दाेन अांदाेलनकर्ते, २० पाेलिस कर्मचाऱ्यांना दुखापत झाली अाहे. त्यांच्या तक्रारीवरून संताेष उर्फ पप्पू शिंदे, साहेबराव दामू शिंदे, शरद भामरे, अमृत भामरे यांच्यासह १०० ते १५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. यापैकी ८० जणांना पाेलिसांनी ताब्यात घेतले अाहे. त्यांना रात्री वाजता हिरे मेडिकल काॅलेज येथे वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात अाले असून, वैद्यकीय तपासणीनंतर अटकेची कारवाई केली जाणार अाहे. या घटनेचा तपास शहर पाेलिस ठाण्याचे पाेिलस निरीक्षक डी.व्ही.वसावे करीत अाहेत. ताब्यात घेतलेल्या आंदोलनकर्त्यांना उद्या बुधवारी न्यायालयात हजर केले जाईल.
बातम्या आणखी आहेत...