आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव- मक्तेदारामार्फत चालवण्यात येत असलेली ‘जेएमटीयू’ ही शहर बससेवा गुंडाळण्याच्या हालचाली पालिकेकडून सुरू आहेत. तथापि, नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून सोलापूरप्रमाणे केंद्राच्या योजनेतून शहर बससेवा सुरू करण्याचा प्रशासनाचा विचार आहे.
मोठय़ा शहरांच्या सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी केंद्राने ‘जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युवल मिशन’ योजनेंतर्गत सिटी बस सुरू करण्यासाठी अनुदान देण्याची योजना अस्तित्वात आणली आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून 80 व राज्य शासनाकडून 20 टक्के अनुदान दिले जाते. त्यानुसार सोलापूर महापालिकेच्या 200 बसेसचा प्रस्ताव नुकताच मान्य झाला असून, 108 कोटींच्या निधीला मंजुरीदेखील मिळाली आहे. त्या मानाने जळगाव महापालिकेची आवश्यकता कमी असून, 25 ते 50 बसेस उपलब्ध झाल्या तरी ते पुरेसे होणार आहे. सांगली पालिकेने अवघ्या 80 दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण करून या प्रस्तावाला मान्यता मिळवली आहे. जळगाव महापालिका हद्दीत सुरू असलेली शहर बससेवा अडचणीत आल्याने प्रशासनाने या योजनेचा फायदा घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.