आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२८३ कर्मचाऱ्यांनी तासांत संकलित केला १८ टन कचरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - पालिका प्रशासनाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सहादिवसीय विशेष शहर स्वच्छता अभियान हाती घेतले आहे. १७ ते २२ ऑक्टोबर या काळात राबवल्या जाणाऱ्या अभियानाला सोमवारी प्रभाग क्रमांक चारपासून सुरुवात झाली. पालिकेच्या २८३ कर्मचाऱ्यांनी दुपारी ते या काळात सुमारे १८ टन कचरा संकलित केला.
शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे ओरड वाढल्यानंतर पालिका प्रशासनाने आता स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. ऐन सणवारांत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने पालिकेने विशेष स्वच्छता मोहिमेचे नियोजन केले. १७ ते २२ ऑक्टोबर या काळात शहराच्या विविध भागांमध्ये विशेष अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सोमवारी प्रभाग क्रमांक चारपासून स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक प्रमोद नेमाडे यांच्यासह परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत अभियानाला सुरुवात झाली. स्वच्छता अभियानात पालिकेने सातत्य ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

याभागांत झाली स्वच्छता : सोमवारीसहकारनगर, शांतीनगर, पांडववाडा, शारदानगर, आेंकारनगर, सोपान कॉलनी, रामेश्वरनगर, संत गजानन महाराजनगर, सिद्धिविनायकनगर, प्रभात कॉलनी, भालचंद्रनगर, साेमाणी गार्डन, महात्मा फुलेनगर, काशीरामनगर, खळवाडी, आराधना कॉलनी, विद्यानगर, रेल दुनिया, भोईनगर, श्रीनगर, हुडको कॉलनी, अयोध्यानगर, सतारे, कोळीवाडा, मरीमाता मंदिर परिसर, गणेश कॉलनी, मुक्ताईनगर, भिरूड कॉलनी, सुकदेवनगर, माेहितनगर या भागांत स्वच्छता करण्यात आली.

रहिवाशांना दिलासा : स्वच्छताअभियानात पहिल्याच दिवशी प्रभाग क्रमांक चारमधील विविध भागांमध्ये १८ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा संकलित झाल्याने परिसरातील रहिवाशांना दिलासा मिळाला. पावसाळ्यातही शहरातील अस्वच्छतेची समस्या वाढली होती. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने पालिकेच्या कारभाराविषयी तीव्र रोष व्यक्त केला जात होता. अखेर सणवारांच्या पार्श्वभूमीवर पालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतल्याने शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, शहरातील स्वच्छता मोहीम केवळ सणवारांपुरती राबवता कायमस्वरूपी राबवली जावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Áमंगळवारी सकाळी तापीनगर, डॉ.आंबेडकरनगर, अनिलनगर परिसर, हिंदू हाऊसिंग सोसायटी, झोपे कॉलनी, कवाडेनगर, आरपीडी रोड, ताप्ती क्लब, राहुलनगर, लोणारी समाज मंगल कार्यालय परिसर, इमामवाडा, दामू कुंभारवाडा, गमाडिया प्रेस, गवळीवाडा, फकीरवाडा, कडू प्लॉट या भागांत स्वच्छता होणार आहे. त्यादृष्टीने नियोजन केले आहे.

Áस्वच्छता अभियानात पालिकेचे २८३ कर्मचारी सहभागी झाले आहेत. यामध्ये २६० सफाई कामगार, आठ मुकादम, आठ स्वच्छता निरीक्षक, सहा ट्रॅक्टरचालक आणि एक लोडर अशा कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहिमेला गती दिली आहे.
आज या भागांमध्ये होणार स्वच्छता

स्वच्छतेला प्राधान्य
Ãशहरातील दैनंदिन स्वच्छतेला प्राधान्य दिले जाणार आहे. सहादिवसीय स्वच्छता अभियानात २८३ कर्मचाऱ्यांचा सहभाग असून नागरिकांनी स्वच्छतेसाठी सहकार्य करणे अपेक्षित आहे. अभियानाच्या पहिल्याच दिवशी १८ टन कचऱ्याचे संकलन झाले.
बी.टी.बाविस्कर,मुख्याधिकारी

बातम्या आणखी आहेत...