आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर स्वच्छतेसाठी संघटना सरसावल्या, एक तास परिसर स्वच्छता उपक्रमात अनेकांचा सहभाग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात परतीचा पाऊस, तुंबलेल्या गटारी अाणि कचऱ्यामुळे राेगराई पसरली अाहे. नवरात्राेत्सवात घराघरात स्वच्छता केली जात असल्याने घरासाेबत परिसरही स्वच्छ करण्याचे अावाहन ‘दिव्य मराठी’ने केले अाहे. या अावाहनाला प्रतिसाद देत शहरातील विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, नागरिकांसह महापालिकेनेदेखील प्रतिसाद देत सहभागी हाेण्याची तयारी दर्शवली अाहे. येत्या दाेन दिवसांत या अभियानात सहभागी नागरिक, संघटना त्या-त्या भागात एक तास स्वच्छता अभियान राबवणार अाहेत.जमा हाेणारा कचरा महापालिकेच्या यंत्रणेकडून जमा केला जाणार अाहे. ‘दिव्य मराठी’ने अावाहन केलेल्या अभियानात गणेशाेत्सव मंडळाचे महामंडळ, जळगाव फर्स्ट संघटना, दर्जी फाउंडेशन, विविध शाळांमधील स्काऊट अाणि गाईड्स, शाळांमधील अारएसपीचे विद्यार्थी, युवा क्रांती प्रतिष्ठान, मूजे महाविद्याल्यातील नेचर क्लब अाणि महानगरपालिकांनी सहभागी हाेण्याची तयारी दर्शवली अाहे. या संघटनांमार्फत येत्या दाेन दिवसांत विविध भाग, रहिवासी परिसर, मार्केटमध्ये स्वच्छता अभियान राबवले जाणार अाहे. अापापल्या रहिवासी परिसरात स्वच्छता अभियान राबवून कचरा जमा केला जाणार अाहे.

स्वच्छता अभियानात व्हा सहभागी
येत्या२८ २९ सप्टेंबर राेजी नागरिकांनी त्यांच्या परिसरात एक तास स्वच्छता अभियान राबवावे. अापल्या सहभागाची माहिती ‘दिव्य मराठी’कडे पाठवावी. जमा हाेणार कचरा उचलण्यासाठी त्या-त्या भागातील मनपा अधिकारी, स्वच्छता निरीक्षकांशी संपर्क साधावा. तसेच शहरातील मनपाच्या युनिट कार्यालयातील निरीक्षकांशीही संपर्क साधता येईल.
अभियानासाठी मदत
^शहराच्या स्वच्छतेसाठी महापालिकेकडून सर्व प्रयत्न केले जात अाहेत. नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छता अभियानासाठी सर्वताेपरी सहकार्य करू. नितीनलढ्ढा, महापाैर
^साथीचेराेगपसरू नये म्हणून नवरात्रापूर्वी गणेशोत्सव मंडळांच्या सहकार्याने त्या-त्या भागात स्वच्छता अभियान राबवू. सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून शहर स्वच्छतेसाठी प्रयत्न करणार अाहाेत. सचिन नारळे, उपाध्यक्ष, गणेशाेत्सव मंडळांचे महामंडळ.
बातम्या आणखी आहेत...